सव्वा लाखांच्या लिडने आ.आशुतोष काळेंची विजयश्री

माझा विजय विकासाचा आणि विश्वासाचा-आ.आशुतोष काळे कोपरगाव,दि.२३-२०१९ ला मतदार संघातील जनतेला जी काही आश्वासने दिली त्यापैकी बहुतांश आश्वासने पूर्ण केली व काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. हीच विकास कामे घेवून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो.मतदार संघातील जनतेने पाच वर्षात झालेला विकास डोळ्यासमोर ठेवून माझ्या कामावर विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा सेवेची संधी देवून मतांचा […]

आ.आशुतोष काळेंनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

कोळपेवाडी,दि.२०- राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ.आशुतोष काळे यांनी आपल्या कुटुंबासह माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला.       माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी मतदान केले. देशाच्या हितासाठी […]

एफआरपीप्रमाणे साखरेच्या एमएसपी वाढीबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयाने निर्णय घ्यावा –आ.आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु कोपरगाव,दि.८- ऊसाची एफआरपी वाढविली जाते हा निर्णय अतिशय स्वागतार्ह असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. परंतु ज्या वेळी ऊसाची एफआरपी वाढविली जाते त्यावेळी एमएसपी अर्थात साखरेची विक्री किंमत देखील वाढविली पाहिजे. मागील ५ वर्षाची आकडेवारी पहाता हंगाम २०२०-२१ मध्ये साखरेची एमएसपी रु.३१००/- प्रति क्विंटल तर ऊसाची […]

हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करा

कोपरगाव,दि.८ :- चालू खरीप हंगामात कोपरगाव मतदार संघात सोयाबीनचे उत्पन्न मुबलक झालेले आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य दर मिळावा यासाठी शासनाकडून हमी भाव जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे केली आहे. हातात नकदी पैसा देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं. […]

वावी-लॉकर तोडून सव्वा तोळे सोने लंपास

वावी,दि.८-श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक गोंदे येथील दिलीप पंडीत निकम यांच्या घराचे कुलूप तोडून लाकडी लॉकरमधील ७ ग्राम वजनाचे झुबे व ५ ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील वेल चोरीस गेले आहेत.     याबाबत वावी पोलीस ठाण्यात दिलीप निकम यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास हवालदार बलसाने करीत आहे.

पवार साहेबांवर केलेल्या टीकेचा आ. आशुतोष काळेंकडून निषेध

कोळपेवाडी,दि.७- शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याबद्ल मला मनस्वी नितांत आदर असून सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या पातळीवरील केलेली टीका महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करू शकत नाही आणि हि महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती देखील नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा […]

वावी-घराचे कुलूप तोडून २६ हजार चोरीला

वावी,दि.६-येथून जवळच असलेल्या धारणगाव येथील मंगल भागवत झाडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून पंचपात्रीत ठेवलेले २६ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.    याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गोरे करीत आहे.