श्रीक्षेत्र मढी येथे रविवारी भटक्या जाती-जमातीची ऐतिहासिक परिषद- जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोशी

कोपरगाव,दि.१९-अखिल भारतीय भटका जोशी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली भटक्यांची पंढरी अशी ओळख असललेल्या श्री.क्षेत्र मढी ता.पाथर्डी येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी भटक्या जाती जमातीच्या ऐतिहासिक परिषदेचे रविवार (दि.२३) मार्च रोजी दुपारी ठीक १२ वाजता आयोजन भटका जोशी सामाज सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष वामनतात्या मापारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असल्याची माहिती भटका जोशी समाज सेवा […]

डॉ.नंदा वरपे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जिल्हायुवा अध्यक्षपदी नियुक्ती

सिन्नर,दि.१३-तालुक्यातील वावी येथील डॉ.नंदा संतोष वरपे यांच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील  कामगिरीची दखल घेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी नाशिक जिल्हा युवा अध्यक्षपदी त्यांची निवड केली.त्यांना लेखक,कवी प्रा.डॉ.नितीन नाळे यांचे सहकार्य लाभले.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

फुलेनगर येथे जागतिक महिला दिन साजरा

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१०-तालुक्यातील फुलेनगर येथील हिरकणी महिला ग्रामसंघ व ग्रामपंचायतकडून जागतिक महिला दिन उत्सहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  वैद्यकीय अधिकारी डॉ.राजश्री अहिरे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच तुकाराम पवार,उपसरपंच  ज्ञानेश्वर लोंढे,सुरेखा विजय कुटे,डॉ.सायली मेदगे ,रचना धाडगे मॅडम,सारिका घेगडमल,आशा शेळके,कविता जाधव,अर्चना भगत आदी उपस्थित होते.    समाजात काम करत असताना स्त्रियांना कोण कोणत्या समस्यांना […]

घरासमोरून मोटारसायकल चोरीला,वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिन्नर,दि.६-किरण रावसाहेब वेताळ रा.वारेगाव यांच्या घरासमोर उभी असलेली युनिकांन मोटारसायकल क्र एम एच १५ जी के ७१४९ चोरीस गेली असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतम खरात यांना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार प्रधान

    नाशिक,दि.३-सुप्रीम ह्युमन राइट्स इंटेलिजन्स इंडिया, नाशिक यांच्याकडून गौतम यशवंत खरात यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्काराने पद्मश्री परशुराम खुणे,प्रमोद जाधव,संस्थापक अध्यक्ष श्रीमंत बागल,राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार डीग्गे आदी मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.