कोपरगाव,दि.३०- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलची इयत्ता नववी ची विद्यार्थिनी कु.वैष्णवी ज्ञानेश्वर पवार हिने राज्यस्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा (१७ वर्ष मुली वयोगट) जिंकून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. स्पर्धेची विजेती वैष्णवी व तिचे पालक विनोद पवार यांचा शाळेचे प्राचार्य नूर शेख […]
कोपरगाव,दि.२९- आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला गती देतांना कोपरगाव शहरातील अनेक महत्वाच्या शासकीय कार्यालयांच्या इमारतींना देखील निधी दिला आहे. यामध्ये दिवाणी न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत, पंचायत समिती इमारत आदी इमारतींचा समावेश असून या सर्व इमारतींचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यापैकी दिवाणी न्यायालय, उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची आ.आशुतोष काळे यांनी […]
नाशिक,दि.२८-अमोलसिंग कोमलसिंग ठोके रा.वडगाव,ता.मालेगाव यांच्या शेतातील खिल्लारी जातीचा बैल चोरीस गेला आहे.याबाबत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक,दि.२७-बुरुकुल वाडी येथील गट नंबर २९/१ मध्ये लागवड केलेले हिरवे व पिवळे रंगाचे ३ टन टरबूज फळ चोरीस गेल्याची फिर्याद कामरन इरफान राठोड यांनी मनमाड पोलीस ठाण्यात दिली आहे.
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२६-तालुक्यातील पाथरे बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिनेवस्ती येथील इयत्ता चौथीचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आला त्यानंतर चौथीतील विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत चिने,सुरेखा जोरे,पगार यांनी भाषणे केली.मुख्याध्यापक निमसे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा […]
कोपरगाव,दि.२६- अवैध वाळू तस्करीबाबत असंख्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. याबाबत अनेकवेळा महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या परंतु त्यांच्याकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आपला संयम आता संपला आहे. वेळप्रसंगी कायदा हातात घेवून मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल असा ईशारा देत आ.आशुतोष काळे यांनी अवैध वाळू तस्करीविरोधात […]
कोपरगाव,दि.२५- कोपरगाव शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आशेचा किरण असलेल्या कोपरगाव शहरातील बस डेपो, व्यापारी संकुलाबरोबरच चार्जिंग स्टेशनचे काम शीघ्र गतीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव आगार प्रमुख अमोल बनकर यांना दिल्या. कोपरगाव शहराच्या एस.टी. बस आगारामध्ये सुरु असलेल्या वर्कशॉप, चार्जिंग स्टेशन व व्यापारी संकुलाची आ. आशुतोष काळे यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी […]
सिन्नर,दि.२४-राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरणकार्यक्रमांतर्गत टीबीमुक्त झालेल्या सिन्नर तालुक्यातील २३ग्रामपंचायतींना कांस्यपदक तर ३ ग्रामपंचायतींना रौप्यपदक देऊन आज गौरवण्यात आले.
नाशिक,दि.२३-सारतळेवस्ती साकोरा ता.नांदगाव येथील वंदना चैतन्य पाटील यांच्या मालकीची १३ ते १४ वर्षाची पांढऱ्या रंगाची तिच्यावर फिकट काळ्या रंगाचे उभे पट्टे असलेली खिल्लारी जातीची गाय चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सिन्नर,दि.२२-सोनांबे शिवारातील हॉटेल रॉयल ग्रीन पॅलेस बारचे शटर वाकवून विविध कंपनीच्या ६८ हजार किंमतीच्या व्हिस्की चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.याबाबत दिपक तुकाराम जगताप यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नाशिक,दि.२१-मालेगाव ते अहिल्यानगर प्रवासादरम्यान सावरगाव येथे उज्जवला शिवाजी धाडावाल यांची ३ तोळे वजनाची सोन्याची पोत व १० भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेट अज्ञात दोन महिलांनी चोरून नेल्याची फिर्याद येवला तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
सिन्नर,दि.२०-तालुक्यातील पाथरे येथील आयोध्याबाई बाळकिसन जोशी यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात ३ मुले,३ मुली,सुना,नातवंडे,पणती असा परिवार आहे.डॉ.अशोक जोशी व सामाजिक कार्यकर्ते संतोष जोशी यांच्या त्या मातोश्री होत.
सिन्नर,दि.२०-तालुक्यातील वावी गांवचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा यात्रोत्सव उद्या दि.२१ पासून सुरू होणार असून दोन दिवस यात्रोत्सव चालणार आहे. आज सायंकाळी ६ वाजता गावांतील तरुण गंगेचे पाणी आणण्यासाठी जाणार असून उद्या सकाळी ९ वाजता गंगेचे पाणी कावड मिरवणूक गावांतून निघणार आहे.त्यानंतर सकाळी ११ वाजता अभिषेक सत्यनारायण करून सायंकाळी ६ वाजता भव्य रथाची […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१९-तालुक्यातील दुसंगवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तुंग भरारी घेऊन गुणवत्ता यादीत यश संपादित केले आहे.सन २०२४-२०२५ या वर्षाची मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेची गुणवत्ता यादी शासनाने नुकतीच जाहीर केली. श्रद्धा भाऊपाटील मुंगसे (इयत्ता पहिली – राज्यात आठवी),सार्थक अण्णा देव्हाड (इयत्ता चौथी – राज्यात त्र्येपणावा),समृद्धी आण्णासाहेब दौंड(इयत्ता दुसरी […]
नाशिक,दि.१८-बाळकृष्ण देवराम बनकर रा.शिरसाणे ता.चांदवड यांच्या घराचे कुलूप तोडून पाटाच्या लॉकरमधून १० ग्रॅम वजनाची सोन्याचे वेल व टॉपस,२५० ग्रॅम वजनाचे चांदीचे बाजुबंद व ३५ हजार रोख रक्कम चोरट्यांनी सकाळी ९ ते दुपारी १२.३० च्या दरम्यान चोरून नेली आहे.याबाबत वडनेरभैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.