मोठी स्वप्ने बघा आणि ती साकार करा-उपजिल्हाधिकारी सायली सोळंके

  कोपरगाव,दि.३१ -विद्यार्थ्यांनी नेहमीच मोठी स्वप्ने बघावीत आणि ती साकार करण्यासाठी जिवाचे रान करावे, असे आवाहन अहिल्यानगरच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती सायली सोळंके यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कै.सौ.सुशिलाताई ऊर्फ माईसाहेब काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या बोलत […]

आर.पी.गोडगे पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात संपन्न

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.३०- तालुक्यातील वावी येथील आर.पी.गोडगे पाटील पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन भक्तीसागर मोठ्या उत्साहात साजरे झाले स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने प्रक्षेक मंत्रमुग्ध झाले.यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका मृणालीताई गोडगे पाटील,सरपंच विजय काटे ,उपसरपंच प्रेमलता जाजू ,ज्येष्ठ पत्रकार सुधीर ओझा ,संतोष भोपी ,संतोष बिरे ,अजित देसाई,माजी सरपंच प्रशांत कर्पे,वावी सोसायटीचे चेअरमन रामदास घेगडमल, शाळेच्या सीईओ […]

वावी-समृध्दी महामार्गावर संरक्षण भिंतीचे लोखंडी अँगल चोरणारी टोळी जेरबंद करण्यात वावी पोलीसांना यश

गणेश ओझा,प्रतिनिधी   सिन्नर,दि.३०-समृध्दी महामार्गावर असलेल्या संरक्षण भिंतीस असलेले लोंखडी गज चोरीच्या घटना काही दिवसांपासून घडत असल्याने विक्रम देशमाने पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण,आदीत्य मिरखेलकर अपर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण,निलेश पालवे उपविभागीय पोलीस अधीकारी निफाड उपविभाग यांनी उपाययोजना राबविण्याबाबत सुचना केल्या होत्या.त्याअनुषंगाने वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी समृध्दी महामार्गालगतच्या ग्रामस्थांच्या मिटींग घेउन त्यांना खबरदारीपुर्वक आवश्यक सुचना […]

दिव्यांग क्रीडा स्पर्धेतील गुणवंताचा दिव्यांग संघटनेकडून गुणगौरव

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२९-तालुकास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक गायन प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे शाळेच्या विद्यार्थिनी कु.आरुषी संदीप साळवे  हिने प्रथम क्रमांक तर कु.धनश्री संदीप साळवे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.      त्यांच्या यशाबद्दल दिव्यांग  संघटनेचे पदाधिकारी वैभव वाघ,दत्ता लोंढे,राहुल चतुर,अशोक शेळके,सुदाम शेळके यांनी त्यांचे शाळेत जाऊन अभिनंदन करीत दिव्यांग संघटनेतर्फे ११०० रुपयांचा धनादेश […]

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला व्हीएसआयकडून ‘तांत्रिक कार्यक्षमता’ पुरस्कार प्रदान

कोपरगाव,दि.२३- राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणारी व साखर उद्योगात अग्रेसर असलेली शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी बु.) यांच्या मार्फत राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना गळीत हंगामात सर्वोत्कृष्ठ कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यानुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२३/२४ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मध्य विभागातून द्वितीय क्रमांकाचा ‘तांत्रिक कार्यक्षमता’ […]

दांपत्याचे सोने व रोख रक्कम चोरणारा भामटा १२ तासांचे आत गजाआड करण्यात वावी पोलीसांना यश,पावणे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गणेश ओझा,प्रतिनिधी   सिन्नर,दि.२२-दिल्लीमधील व्यापारी असलेले कमल रतनलाल अग्रवाल वय ५४ वर्ष हे त्यांची पत्नी व त्यांचे नातेवाईकांसह महाराष्ट्रात फिरण्याठी आलेले असतांना दि.२० जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथुन तन्वी ट्रेव्हल्स गाडीने नाशिककडेसमृध्दीमहामार्गाने येत असतांना समृध्दी महामार्गावरील म-हळ बु ता.सिन्नर जि नाशिक येथे असलेल्या सर्विस रोडवरील हॉटेल दक्षीण दन भारत मध्ये दुपारी १३.०० वा सुमारास जेवणाठी थांबले होते. तेव्हा […]

गौतम पब्लिक स्कुलचे शासकीय चित्रकला स्पर्धेत यश

गणेश ओझा,प्रतिनिधी कोपरगाव,दि.२२-महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. दोन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला असून कोळपेवाडी केंद्रातून दोनही परीक्षांमध्ये गौतम पब्लिक स्कूल अव्वल ठरलेली आहे.            विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील कलात्मक […]

भाजीपाला घेत असताना २ तोळ्यांची मंगलपोत लंपास

नाशिक,दि.१२-सटाणा येथील आठवडा बाजारात मटन   मार्केटसमोर  भाजीपाला घेत असताना अज्ञात चोरट्याने हातचलाकीने वेणूबाई शिवाजीराव गवळी रा.शरदनगर,सटाणा यांची २ तोळ्यांची मंगलपोत चोरून नेली आहे.याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रमसंस्कार शिबिरातून शेतीचे प्रश्न चर्चिले गेले पाहिजे-कवी अमोल चिने

कोपरगाव,दि.१२- राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, समाज सेवा आदी कर्तव्यांची तत्वमुल्ये रुजली जावून वेळप्रसंगी देशसेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावले पाहिजे याची शिकवण मिळते.आपले देश कृषी प्रधान देश असून शेतकरी हा राष्ट्राचा कणा आहे. त्यामुळे शेतकरी हिताकडे देखील लक्ष देणे गरजेचे असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न […]

काळानुरुप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा -आ.आशुतोष काळे

गौतम सहकारी बँकेत मोबाईल बँक सुविधा सुरु गणेश ओझा,प्रतिनिधी कोपरगाव,दि.१२- तंत्रज्ञानाच्या युगात, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. भारतासारख्या प्रगत देशात, जिथे एक मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये वावरतो, तिथे मोबाईल बँकिंगची सेवा एक महत्त्वपूर्ण युगांतरीत सुधारणा ठरली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुरुप होणारे बदल आत्मसात करून […]

वावी-५० हजारांचा मोबाईल चोरीस

  सिन्नर,दि.११-तालुक्यातील दापुर येथील मोठे बाबा मंदिराच्या परिसरातील संदीप आव्हाड यांच्या किराणा दुकानासमोरून निवृत्ती रामभाऊ कराड रा. पाटोळे यांचा ५० हजार रुपये किंमतीचा सॅमसंग फ्लोड -५ मोबाईल अज्ञात २ तरुणांनी चोरून नेला असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलचे यश

कोपरगाव,दि.१०-कोपरगाव तालुका गणित व विज्ञान ५२ व्या प्रदर्शनाचे संवत्सर येथे आयोजन करण्यात आले होते. आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलने या गणित व विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले उपकरणे प्रदर्शित केले होते. यामध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी या गटात गौतम […]

वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी थांबेना,दुकान फोडून ६५ हजारांचा ऐवज लंपास

सिन्नर,दि.९-फर्दापूर भोकण नाल्यालगत संदीप दिनकर उगले यांच्या मोटार रिव्हायडिंग दुकानाचे कुलूप तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करून शटर वाकवून ६४२५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असून याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आता डिझेलची चोरी

सिन्नर,दि.८-गोंदे शिवारात समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या मालट्रक ट्रेलर क्र आर जे ०४ जीबी ९१८४ हिचे डिझेल टाकीचे झाकण तोडून २३० लिटर डिझेल चोरीस गेल्याची घटना घडली आहे.याबाबत वावी पोलीस ठाण्यात बाबूलाल चुतराराम जाट रा.बोरवा,ता.बायतू,राज्य.राजस्थान यांनी फिर्याद दिली आहे.

समाजकल्याण मंत्री ना.संजय शिरसाठाचे आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत

कोपरगाव,दि.८ – महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाठ यांनी कोपरगावाला धावती भेट दिली. यावेळी साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगाव शहरातील श्री साईबाबा तपोभूमी येथे साईबाबांचे मनोभावे दर्शन घेवून आशीर्वाद घेतला. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाठ यांचे स्वागत केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येणारे साईभक्त राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी  लगत असलेल्या […]