जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
धाराशिव,दि.११-महसूल विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर”कळंब तालुक्यातील नायगांव येथे संपन्न झाले.
शिबिरात महसूल,भूमीअभिलेख,ग्रामविकास,कृषी, महिला व बालकल्याण,पशुसंवर्धन,महावितरण,एस.टी.महामंडळ,
आरोग्य,शिक्षणसह व ईतर विविध १९ विभागातील सेवा पुरविण्यात आल्या.या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील नागरिक,शेतकरी,महिला,विद्यार्थ्यांचे महसूली विभागाशी संबंधित विविध समस्या व तक्रारीवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय साधल्यामुळे महसूलसह,भूमी अभिलेख,ग्रामविकास,कृषी, महिला व बालकल्याण,पशूसंवर्धन,महावितरण,एस.टी. महामंडळ, आरोग्य आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरात ५२८ लोकांनी प्रत्यक्ष लाभ तर १३८ लोकांचे विविध विषयासंबंधीचे अर्ज स्वीकृती असे एकूण ६६६ नागरीकांनी शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला.कार्यक्रमासाठी कळंब उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार हेमंत ढोकले,अप्पर तहसीलदार प्राजक्ता पाटील,नायगांवच्या सरपंच वनमाला राजाभाऊ पाटील,उपसरपंच अशोक माळी,नायब तहसीलदार पंडित जाधव व गोकुळ भराडिया,पंचायत समिती सदस्य सौ.योगेश्वरी गणेश पवार,मंडळ अधिकारी वर्षा ढेकरे ,महसूल मंडळ नायगाव अंतर्गतसरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,नायगांव ग्राममहसूल अधिकारी संजय माळी,रवींद्र नवले रांजणी,किशोर गायकवाड,उमेश जाधवर,ओंकार झोरी,पल्लवी जामदार कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील,मंडळातील बी.एल.ओ,शरद मधुकर शितोळे,महादेव शितोळे,रवी गोरे,महसूल सेवक बालाजी राऊत,पांडुरंग आल्टे व रामेश्वर मुंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कल्याण पांचाळ यांनी केले