नाशिक,दि.२४- कळवण तालुक्यातील आठंबे येथील सुरेश दत्तू बागुल यांच्या घराच्या छताचे सिमेंट पत्रे फोडून लोखंडी कपाटातुन सोने,चांदी व रोख रक्कम असा २,३६,१०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.याबाबत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरसाट करीत आहे.
सिन्नर,दि.२३-संविधान सन्मान समिती सिन्नर तालुका यांच्याकडून परभणी येथील पोलीस कोठडीत मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी,परभणी येथील संविधान शिल्पाची विटबांना करणाऱ्या नराधमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व बीड येथील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमूख मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा आशयाचे निवेदन सिन्नर तहसीलदार,सिन्नर पोलीस ठाणे […]
ऐतिहासिक मताधिक्याने विजयी केल्याबद्दल आ.आशुतोष काळेंनी मानले मतदारांचे आभार गौतमनगर,दि.२३:- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी निवडून आलो. पाच वर्षात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आणलेला निधी ज्या गावांनी मताधिक्य दिले त्या गावांना दिला आणि ज्या गावातून मताधिक्य मिळाले नाही त्या गावांना पण तेवढाच निधी देवून निधी वाटपात भेदभाव केला नाही. विधानसभा निवडणुकीच्या […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२३-मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सायाळे शिवारातून एमएसडी फार्मासिटीकल प्रायवेट लिमिटेड,भिवंडी कंपनीचा ५२ बॉक्समध्ये असलेला २२ लाखांचा औषधाचा साठा चोरीस गेला आहे.याबाबत राकेश गांगुर्डे,ट्रान्सपोर्ट व्यवस्थापक( कल्याण पूर्व) यांनी वावी पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक कोळावळे करीत आहे.
सिन्नर,दि.२२-महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेवून घराकडे पायी जात असताना समोरून पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने मिनाबाई दिलीप वानखेडे यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून चोरून नेली याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक टकले करीत आहे.
आ.आशुतोष काळेंची हिवाळी अधिवेशनात मागणी नागपूर,दि.२१-कोपरगाव शहरालगत असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जागेवर काही महिन्यापूर्वी तत्कालीन उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांनी एमआयडीसी उभारण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सदरची जागा तातडीने एमआयडीसीकडे त्वरित वर्ग करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करून एमआयडीसी उभारण्यासाठी पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकले आहे. कोपरगाव मतदार संघातील विकासा […]
नाशिक,दि.२१- वणी पोलीस ठाणेहद्दीत कसबे वणी गावातील के.आर.टी.कॉलेजचेसमोर वणी ते सापुतारा जाणारे रोडवर अवैधरित्या मद्याची वाहतुक होत असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने वणी ते सापुतारा जाणारे रोडवर सापळा रचुन एका हुंडाई कंपनीचे इवॉन कारवर छापा टाकुन देशी मद्याचा १,६८,७००/- रूपये किंमतीचा अवैध मद्यसाठा व […]
कोळपेवाडी,दि.२१ :-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुजाण मतदारांनी पुन्हा एकदा आ.आशुतोष काळे यांच्या हाती मतदार संघाच्या विकासाची दोरी सोपवून त्यांना ऐतिहासिक मताधिक्यांनी निवडून दिले आहे. त्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी सोमवार (दि.२३) रोजी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर मा.आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २.०० वाजता ‘कृतज्ञता सोहळा’ व मतदारांच्या वतीने भव्य ‘नागरी सत्कार सोहळा’ आयोजित […]
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे आ.आशुतोष काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष नागपूर,दि.२१महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या वीज पंपासाठी सोलर उर्जेचा वापर करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून शेतकऱ्यांचे ७.५ एचपी पर्यतच्या वीजपंपाचे वीज बिल माफ करून मागेल त्या शेतकऱ्याला सोलर पंप देण्याचा निर्णय अतिशय महत्वाचा असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. परंतु महावितरणकडे शेतकरी नवीन वीज कनेक्शनची मागणी करण्यासाठी गेले असता त्यांना […]
सौ. सुशीलामाईंच्या विचारांचा दूरदर्शीपणा आजही प्रेरणादायी -सौ.पुष्पाताई काळे कोपरगाव,दि.२१– पूर्वी महिलांना समाज प्रत्येक बाबतीत अलिप्त ठेवत असे. आज अशी परिस्थिती नाही. पूर्वीची स्त्री ही खऱ्या अर्थाने अष्टावधानी आणि दूरदर्शी विचारांची होती. याचा प्रत्यय स्व.सौ.सुशीलामाईंच्या व्यक्तिमत्त्वातून येतो.जे आपल्या मागे आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या आनंदात आनंद मानणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच दुसऱ्यांच्या प्रगतीत आणि दुसऱ्याच्या सुखातच आनंद […]
वावी(वार्ताहर)-येथील ग्रामपंचायतच्या सदस्य मीना मंडलिक यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच विजय काटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.उपसरपंच पदासाठी प्रेमलता जाजू यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. या अर्जावर सूचक म्हणून माजी सरपंच प्रशांत कर्पे यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत […]
सिन्नर,दि.१९-सिन्नर बसस्थानकात सुशिला खंडू गवते रा. स्लेटर रोड, मुबंई ह्या दुपारी २.१० च्या सुमारास बसमध्ये चढत असताना हातातील अडीच तोळे वजनाची सोन्याची बांगडी कशाच्या तरी सहाय्याने चोरट्यांनी चोरून नेली.याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार गोसावी करीत आहे.
नाशिक,दि.१६-अजय सोमनाथ धोंगडे रा.वाघेरा पैकी गोधड्याचा पाडा यांच्या घराचा दरवाजा तोडून ताराबाई धोंगडे व रतन महादू बेंडकोळी यांना कोयता व सुऱ्याचा धाक दाखवून २५०० रोख रक्कम,सोन्याची नथ,सोन्याचे पॅन्डल,पाच सोन्याचे मनी,पोत व मोबाईल असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक […]
कोपरगाव,दि.१६-राज्यातील २०२४-२५ चा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही साखर कारखान्याकडून ऊस दराबाबत निर्णय घेतलेला नाही. परंतु कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत साखरेच्या घसरलेल्या दराचा विचार न करता २०२४-२५ च्या गळीतास येणाऱ्या ऊसाला पहिली उचल प्र.मे.टन २,८००/- रुपये […]
कोपरगाव,दि.१५-अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रस्थानी असणाऱ्या व मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या ‘गौतम सहकारी बँकेने’ आपल्या कुशल कारभाराच्या जोरावर आजवर अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले असून गौतम सहकारी बँकेच्या उत्कृष्ट कामागिरीबद्दल बँकिंग फंड्रीयरचा ‘बेस्ट ॲन्युअल रिपोर्ट’ प्रमाणे नागरी सहकारी बँकेच्या गटात ‘बँकिंग फंड्रीयर’ मुंबई या संस्थेचा नागरी सहकारी बँक […]