वावी(वार्ताहर)-येथील ग्रामपंचायतच्या सदस्य मीना मंडलिक यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच विजय काटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.उपसरपंच पदासाठी प्रेमलता जाजू यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. या अर्जावर सूचक म्हणून माजी सरपंच प्रशांत कर्पे यांनी स्वाक्षरी केली होती. निर्धारित वेळेत एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा सरपंच काटे यांनी केली.
विशेष बैठकीस माजी सरपंच कन्हैय्यालाल भुतडा, संदीप राजेभोसले, प्रशांत कर्पे, रामराव ताजणे, मीना मंडलिक, साधना घेगडमल, अश्विनी वेलजाळी, दीपाली खाटेकर, मीना काटे उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच मंडलिक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
यावेळी माजी सरपंच रामनाथ कर्पे, विजय सोमाणी, कैलास जाजू, प्रदीप मंडलिक, विनायक घेगडमल, ज्ञानेश्वर खाटेकर, संजय देशमुख, मंदार केसकर, आशिष माळवे,प्रदीप मंडलीक, रामदास घेगडमल, ओंकार मालपाणी, श्यामलाल जाजू, मदनलाल कर्नावट, जयेश मालपाणी, संतोष जोशी, गोपाल जाजू, दत्तात्रय नवले, राम सुरसे, लक्ष्मण नवले, शंकर राजेभोसले, योगेश ताजणे, अनिकेत काटे, सुनील काटे, किरण संधान, गणेश काटे, द्वारकानाथ जाजू, रामदास घेगडमल, अशोक वेलजाळी, संदीप भोसले, जयश्री जोशी ,सुजाता भुतडा अनुराधा जोशी,स्नेहल मालपाणी,जया जाजू , छाया सोमानी , सपना धुत , किरण लढ्ढा, मनिषा जाजु, रंजना जाजु,ज्योती जाजू ,पौर्णिमा जाजु आदी ग्रामस्थ उपस्थित होते.