गणेश ओझा,प्रतिनिधी
सिन्नर,दि.९-ईशानेश्वर मंदिर रस्त्यावर असलेल्या राजेंद्र बबन गोडे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत ४३ इंची टीव्ही,१५ हजारांच्या नवीन साड्या,५ हजार किमतीचे पितळी पातले व तांब्याचा हंडा चोरून नेला आहे.याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.