सिन्नर,दि.३०-अवदा क्लीन प्रोजेक्ट प्रा.लि.कंपनीच्या प्लँटवरील सोलरवरील ४० हजार किंमतीची केबल चोरीला गेली असून एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात शुभम बालाजी खैरे यांनी फिर्याद दिली आहे.
नॅचरल उद्योग समूहाला ६४ कोटी २२ लाख रुपये नफा-बी.बी.ठोंबरे सभासदांना पंचेवीस टक्के लाभांश देणार नॅचरल उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल ८४२ कोटी रुपये जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२९-नॅचरल उद्योग समूहाला अहवाल वर्षात ६४ कोटी २२ लाख रुपये नफा झाला.कारखाना सभासदांना २५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी बी ठोंबरे यांनी दिली. […]
दिल्ली,दि.२८-आजपासून तीन दिवसासाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मध्यरात्री झालेल्या चर्चेनंतर मागे घेत असल्याची घोषणा बँक कर्मचारी युनियन केली आहे.
कोपरगाव,दि.२७-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सोमवार (दि.२८ )पासून राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८, २९ व ३० असे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे गौतमच्या मैदानावर हॉकी प्रेमींना हॉकीचा रोमांचक थरार अनुभवायला मिळणार आहे. संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई […]
२६५ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर मुंबई,दि.२६-राज्य सरकारने महाराष्ट्रातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून त्याबाबतचा अध्यादेश आताच जाहीर केला आहे.ट्रिगर १ नियमानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यात सवलती मिळणार आहे.
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२५- नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी या साखर कारखान्याचा सन २०२६-२७ च्या २५ व्या गाळप हंगामाचा बाॅयलर अग्नि प्रदीपन आज ह.भ.प बाबा महाराज बोराडे यांचे हस्ते आणि नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर संपन्न झाला. कारखान्याचे प्रवर्तक राजेद्र श्रीपती कावळे व सौ.ज्योती […]
घरासमोरून मोटारसायकल चोरीला सिन्नर,दि.२४-सचिन गणपत बरके रा.नांदूरशिंगोटे यांच्या घरासमोरून होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्र.एम एच १५ एच एफ २०५९ ची चोरी झाली असून वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.१८- येथून जवळच असलेल्या राजंणी ता.कळंब येथील नॅचरल उद्योग समूहाच्या एन साई मल्टी स्टेट कोआँपरेटीव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाख ५५ हजार रुपये नफा झाला असून बँकेच्या सभासदाना आठरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष कृषी रत्न बी.बी.ठोंबरे यांनी दिली. एन.साई.मल्टी स्टेट कोआँपरेटीव्ह सोसायटीची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा […]
कोपरगाव,दि.१७^कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर येथे शिक्षक दिन व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, तांत्रिक, सामाजिक व सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांनी दिलेले ज्ञान, मार्गदर्शन व योगदानाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात […]
सिन्नर,दि.१६-एकात्मिक बालविकास सेवा योजना सिन्नर -२ यांच्या अंतर्गत ९ वा राष्ट्रीय पोषण माह -२०२६ ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर कालावधीचा अंगणवाडी कहांडळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. बालकांचा व मातांचा सकस आणि पौष्टिक संतुलित आहार संदर्भात मार्गदर्शन करून माहिती देण्यात आली.पौष्टिक आहाराचे महत्त्व व बालकांना आरोग्य,जंकफुडचे दुष्परिणाम,रोजच्या आहारातील आवश्यक घटक या संदर्भात […]
सिन्नर,दि.१५-फुलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधत शैक्षणिक ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शाळेतील विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच क्रीडा,खेळ,रेखाकाम,हस्तकला, स्वच्छतागृह,वीज सुविधा आदींचा लाभ दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रोजेक्टर सेट व विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून अध्यापन केले जात […]
मुंबई,दि.१३-गणरायाच्या आगमनाआधी जोरदार पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली असून मुंबईत मुसळधार पाऊस झाला तर नवी मुंबई,ठाण्यातही रिपरिप सुरू होती.राज्यातील अनेक भागात हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
लोणी,दि.१२- हॉकीच्या मैदानावर आपल्या विजयाची परंपरा कायम राखत गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करीत विजेतेपद पटकावले आहे. या शानदार विजयाच्या जोरावर गौतम पब्लिक स्कूलचा संघ आता जवाहरलाल नेहरू हॉकीच्या विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. प्रवरा पब्लिक स्कूल, लोणी येथे […]