गौतम पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश प्रक्रिया संपन्न

कोपरगाव,दि.१५- गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तीच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ख्याती असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये मंगळवार (दि.१४) रोजी इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गांची प्रवेश प्रक्रिया पार पडली. गौतम पब्लिक स्कूलच्या शिक्षण पद्धतीवर पालकांचा दृढ विश्वास असल्याने आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांसह विद्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कोपरगाव,दि.१४- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कोकमठाण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यामध्ये कोकमठाण ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आंबेडकर नगर अशा विविध ठिकाणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम आणि गौतम सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन विजयराव रक्ताटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार […]

गौतम पॉलिटेक्निकच्या ११८ विद्यार्थ्यांची निकालापूर्वीच नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्ती

कोपरगाव,दि.१३-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली गुणवत्ता ही एखाद्या खाणीतल्या हिर्‍यासारखी अमूल्य असते परंतु योग्य संधी आणि आधुनिक प्रशिक्षणाच्या अभावी अनेकदा अज्ञात राहते.मात्र जेव्हा या गुणांना योग्य दिशा,सक्षम मार्गदर्शन आणि अत्याधुनिक शिक्षणाची जोड मिळते, तेव्हा हेच विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाने यशाचे नवे शिखर गाठतात हेच कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या संस्थेतील […]

संतोष बिरे यांना मातृशोक

सिन्नर,दि.१२-तालुक्यातील वावी येथील कुसुम मधुकर बिरे(६६) यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,मुलगा,मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.पत्रकार संतोष बिरे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नायगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा ६६६ नागरिकांना लाभ

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.११-महसूल विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर”कळंब तालुक्यातील नायगांव येथे संपन्न झाले. शिबिरात महसूल,भूमीअभिलेख,ग्रामविकास,कृषी, महिला व बालकल्याण,पशुसंवर्धन,महावितरण,एस.टी.महामंडळ, आरोग्य,शिक्षणसह व ईतर विविध १९ विभागातील सेवा पुरविण्यात आल्या.या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील नागरिक,शेतकरी,महिला,विद्यार्थ्यांचे महसूली विभागाशी संबंधित विविध समस्या व तक्रारीवर […]

उन्हाळी हंगामाच्या पाणी मागणी अर्ज भरण्याची मुदत वाढ द्या-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.१०- गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली असून अनेक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज न भरल्यामुळे हे लाभधारक शेतकरी वंचित राहणार आहे त्यासाठी पाणी मागणी भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या.

वावी येथे उद्यापासून श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सव

सिन्नर,दि.९-तालुक्यातील वावी गांवचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा यात्रोत्सव उद्या शुक्रवार दि.१० पासून सुरू होणार असून दोन दिवस यात्रोत्सव चालणार आहे.     आज सायंकाळी ६ वाजता गावांतील तरुण गंगेचे पाणी आणण्यासाठी जाणार असून उद्या सकाळी ९ वाजता गंगेचे पाणी कावड मिरवणूक गावांतून निघणार आहे.त्यानंतर सकाळी ११ वाजता अभिषेक सत्यनारायण करून सायंकाळी ६ वाजता भव्य […]

घराचे कुलूप तोडून १ लाख रोख रक्कमसह सोने चोरीला

सिन्नर,दि.७-प्रशांत जगदीश ठाणेकर रा.क्रांतीचौक,सिन्नर यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ५ हजार रुपये,३ ग्रॅम वजनाचे कानातील व ५ ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र चोरट्यांनी करून नेले आहे.याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्मवीर शंकरराव काळे यांना जयंतीनिमित्त  अभिवादन

कोपरगाव,दि.६-स्व.माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांची १०५ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील स्मृती उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांकडून कर्मवीर शंकरराव काळे यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी त्यांच्या समवेत समाजकारणात सक्रीय सहभागी असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा […]

पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला २.१७ कोटीचा ढोबळ नफा

कोपरगाव,दि.५ – सहकारी पतसंस्था क्षेत्रात आपल्या पारदर्शक कारभाराने आणि विश्वासाहर्तेने स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी केली आहे. २०२५-२६ आर्थिक […]

नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदी दानिश शेख यांची नियुक्ती

नाशिक,दि.४- गौतम पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी व सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले येथे कार्यरत असलेले दानिश शेख यांची नुकतीच नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती झाली असून कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आ. आशुतोष काळे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. अभियंता दानिश शेख हे गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख यांचे […]

कहांडळवाडीतही अवकाळीचा तडाखा,३०० कोंबडया मृत तर शेतीचे लाखोंचे नुकसान

गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.३-सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाने थैमान घालत शेती पिकांचे,घर,गाय गोठे व पोल्ट्रीचे लाखांचे नुकसान केले.जोरदार वारा त्यात गारा पडल्या तर विजेच्या कडकडामुळे कहांडळवाडी येथील रविंद्र कहांडळ यांच्या पोल्ट्रीच्या शेडवर विजेचा खांब पडला तर विजेच्या आवाजामुळे ७० पक्षी ब्राॅयलर पक्षी,संदीप कहांडळ ६० पक्षी ब्राॅयलर तर सुभाष थोरात यांचे १५० लेअर पक्षी […]

दुसंगवाडीत गारांचा वर्षाव,लाखोंचे नुकसान

गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.२-आज दुपारी साडेतिनवाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला पुन्हा एकदा झोडपले त्यात दुसंगवाडी परिसरात १० ते १५ मिनिटे गारांचा जोरदार वर्षाव झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काढणीला आलेल्या गहूला नुकसान झाले तसेच जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे,गोठ्याचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी […]

गौतम सहकारी बँकेला २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ४.१४ कोटींचा नफा           

कोपरगाव,दि.१-सहकार क्षेत्रातील जिल्ह्यात अग्रगण्य संस्था असलेल्या गौतम सहकारी बँकेने ३१ मार्च  रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी केली आहे.२०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेला ४१४.०६ लाख रुपये ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदी करून निव्वळ […]

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

कोपरगांव,दि.३१- मतदारसंघातील काही गावांमध्ये सोमवार दि.३० रोजी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि साबुदाण्याच्या आकाराच्या गारा पडल्याने गहू, कांदा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या कांदा आणि गहू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार आणि महसूल विभागाला तात्काळ […]