गणेश ओझा,संपादक
सिन्नर,दि.२-आज दुपारी साडेतिनवाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला पुन्हा एकदा झोडपले त्यात दुसंगवाडी परिसरात १० ते १५ मिनिटे गारांचा जोरदार वर्षाव झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काढणीला आलेल्या गहूला नुकसान झाले तसेच जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणी घरांचे,गोठ्याचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सरपंच कानिफनाथ घोटेकर यांनी केली आहे.
