गणेश ओझा,संपादक
सिन्नर,दि.३-सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाने थैमान घालत शेती पिकांचे,घर,गाय गोठे व पोल्ट्रीचे लाखांचे नुकसान केले.जोरदार वारा त्यात गारा पडल्या तर विजेच्या कडकडामुळे कहांडळवाडी येथील रविंद्र कहांडळ यांच्या पोल्ट्रीच्या शेडवर विजेचा खांब पडला तर विजेच्या आवाजामुळे ७० पक्षी ब्राॅयलर पक्षी,संदीप कहांडळ ६० पक्षी ब्राॅयलर तर सुभाष थोरात यांचे १५० लेअर पक्षी मृत पडले.तसेच कहांडळवाडी गावातील अनेक डाळींब बागाची फुलगळ झाली व झाडे मोडली तर साहेबराव सोनवणे यांच्या गायगोठ्याचे साईड कंपाऊंड पडून नुकसान झाले असून शासनाने त्वरित बांधावर येऊन पंचनामे करीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कहांडळ यांनी केली आहे.
