सिन्नर,दि.२७-विष्णु शांताराम पालवे यांनी गट नंबर २१७ दोडी खुर्द येथे महाराष्ट्र शासनाच्या योजनेची ५ हॉर्स पॉवरची पाणबुडी मोटार बसवलेली होती ती मोटार अज्ञात चोरट्यांनी केबलसह चोरून नेल्याची घटना घडली असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई,दि.२६-लहरी हवामान आणि शेतमालाच्या अनिश्चित दरामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत असतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी ओळखून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुती शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. परंतु हा निर्णय घेतांना आजवरचा अनुभव पाहता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत काहीसा अन्याय झाला आहे. त्यामुळे ही कर्जमाफी करताना नियमित कर्ज भरणाऱ्या […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२५-तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालय व ॲड.रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना NMMS परीक्षेत ५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पहिल्यांदा मोठया संख्येने विद्यार्थी पास झाले आहे. त्यात कृष्णा गायकवाड १२० गुण,तनिष्का खैरनार १०९,प्रगती यादव १०९,चैतन्य कदम १०८,प्रणित कुऱ्हाडे १०५,चैतन्या ढमाले १०२,ओम पठाडे […]
मुंबई,दि.२४- राज्यात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचा आलेख उंचावत असून सर्वसामान्यांची आयुष्यभराच्या कष्टाची कमाई एका क्षणात लुटली जात आहे याचे लोन कोपरगाव मतदार संघात देखील पोहोचले असून ह्याची गंभीरपणे दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या सायबर गुन्हेगारी बाबत मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उत्तराच्या काळात तारांकित प्रश्न उपस्थित करून राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीकडे सरकारचे लक्ष वेधले. […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२१- शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज रांजणी साखर कारखान्यातील सर्व वजन काटयाची तपासणी भरारी पथकाकडून शुक्रवारी करण्यात आली.नॅचरल शुगर कारखान्यातील सर्व वजन काटयांमध्ये किंचितही फरक नसल्याचे भरारी पथकाने तपासणी केल्यानंतर सांगितले. काटा तपासणीवेळी भरारी पथकाचे प्रतिनिधी तहसीलदार हेमंत ढोकले,वैद्यमापनशास्त्र निरीक्षक वै.वि.स्वामी सहायक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर, लेखा […]
कोपरगाव,दि.१३-तालुक्यातील झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्यावर अपघात होऊन शालेय विद्यार्थ्याचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आज सायंकाळी पुन्हा जवळके येथील अंश विनोद जयस्वाल या पाच वर्षीय बालकाचा ट्रकखाली बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता केंव्हा करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.
सिन्नर,दि.१२-त्रिमूर्ती ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्थेच्या चास शाखेत सन २०१० ते २०२५ काळातील संचालक मंडळाने गैरव्यवहार आणि अपहार केल्याचे लेखापरीक्षक यांच्या निदर्शनास आल्याने वावी पोलीस ठाण्यात रुस्तम सारंगधर कपाटे यांनी फसवणूक,ठकबाजी अधिकलमाअंतर्गत फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करीत आहे.
सिन्नर,दि.१२-तालुक्यातील वावी येथील अवघ्या सहा वर्षांची कादंबरीभूषण लढ्ढा पण स्केटिंग ट्रॅकवर तिचावेग मोठ्यांनाही थक्क करणारा!वावीची ही चिमुकली सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास असून, पुण्यात पार पडलेल्या ‘एंड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिप २०२५-२६स्पर्धेत तिने तिहेरी सुवर्णपदकांची कमाई करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. पुण्यातील लेक्स्ट बँकडस्केटिंग ट्रॅकवर ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी ‘एंड्युरन्स फेडरेशन ऑफ इंडिया’तर्फे राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात […]
नाशिक,दि.११:- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाने नुकतीच नाशिक येथील सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; कंपनीला औद्योगिक भेट दिली.भेटीदरम्यान गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य वसीम शेख यांनी दिली. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीतील आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष प्रोजेक्ट व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट याबाबतचे ज्ञान मिळणार असून त्यामुळे […]
गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.६-तालुक्यातील कारवाडी येथील श्री.स्वामीसमर्थ केंद्रात काही दिवसांपूर्वी चोरटयानी मंदीराचीदानपेटीतील रक्कमेसह ७ किलो वजनाच्या व ३ फुट लांबीच्या २ समई चोरून नेल्या होत्या याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी सदर गुन्हयाचे तपासकामी विशेष तपास पथक स्थापन करुन त्यांना गुन्हयाचे तपासाबाबत मार्गदर्शन […]
सिन्नर,दि.५-सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र.१६० वरील पिंपरवाडी टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन व पीएफ,ईएसआयसी कंपनीने जमा न केल्यामुळे काम बंद आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता याबाबत निर्भीड लेखणीने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण जागे होत त्यांनी संबंधित कंपनी कडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा पगार जमा केला असून ३० मे २०२५ ते २८ […]
गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.४-सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र.१६० वरील पिंपरवाडी टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन व पीएफ,ईएसआयसी कंपनीने जमा न केल्यामुळे काम बंद आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिला आहे. डिसेंबर २०२५ महिन्याचे वेतन व ३० मे २०२५ ते २८ डिसेंबर २०२५ कालावधीतला पीएफ,ईएसआयसीची रक्कम प्रकल्पावरील ४२ कर्मचाऱ्यांची ७ फेब्रुवारीपर्यंत अदा […]