कोपरगांव-मकरसंक्रांती सण काही दिवसांवर आला असून कोपरगाव शहरात नागरिकांची खरेदीची लगबग चालू असल्याने बाजारपेठ फुललेली असताना नायलॉन मांजामुळे एक लहान मुलगा आणि दोन पुरुष असे तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आकाशात उडणाऱ्या पतंगा सोबतच नायलॉन मांजाची टांगती तलावर नागरिकांच्या मानेवर असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी […]
कोपरगाव,दि.३०- राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर येथे पार पडल्या होत्या त्यास्पर्धांमधून महाराष्ट्राचा संघ घोषित करण्यात येवून महाराष्ट्राच्या संघामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या पाच खेळाडूंची निवड आली होती.राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मध्यप्रदेश टिकमगड येथे पार पडल्या. यामध्ये विशेष बाब म्हणजे गौतम पब्लिक स्कूलचा खेळाडू कुमार कृष्णा सातपुते याने महाराष्ट्र हॉकी संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावली अशी माहिती […]
कोपरगाव,दि.२९ – गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२५-२६ करीता पाटबंधारे विभागाकडून अधिकृत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. चालू रब्बी हंगामातील पिकांसाठी डावा व उजवा गोदावरी कालवा अंतर्गत नमुना क्रमांक सात पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नमुना नंबर ७ अर्जासोबत ७/१२ उतारा जोडून ६ जानेवारी २०२६ रोजी […]
कोपरगाव,दि.२८- कोपरगाव मतदार संघातील लौकी गावातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जुना नागपूर-मुंबई हाय-वे ते भवर कदम वस्ती या रस्त्याचे काम विविध अडचणींमुळे मागील अनेक वर्षापासून रखडलेले होते परंतु या रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी दूरू करून रस्त्यासाठी निधीही देवू हा शब्द आ.आशुतोष काळे यांनी लौकी ग्रामस्थांना दिला होता. तो शब्द पूर्ण करून त्यांनी पूर्ण करून या रस्त्याच्या सर्व […]
कोपरगाव,दि.२७/ कोपरगाव पंचायत समिती व कोपरगाव तालुका विज्ञान–गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर्शन दि.२२ ते २४ डिसेंबर कालावधीत के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे पार पडले. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलने चित्रकला प्रदर्शनात प्रथम तर विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२६-वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचेवतीने देण्यात येणारा साल सन-२०२३-२४ चा कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि.या कारखान्यास जाहीर करण्यात आला आहे.नॅचरल उद्योग समुहाने साखर उत्पादनाबरोबरच आर्थिक शिस्तीचे अनेक विक्रम प्रस्तापित केलेले आहेत.कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या नियोजनातून नॅचरल उद्योगसमुहाने शेतकरी व सर्व सामान्य […]
गणेश ओझा,संपादक सिन्नर,दि.२५-राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय राज्यमार्ग क्र १६० च्या डिजाईनमध्ये पायी जाणाऱ्या साईभक्तांसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी १४ कोटी रुपये खर्च करून सुसज्ज असे २ भक्तनिवास खोपडी व पाथरे येथे बांधले खरे गेली परंतु ४ वर्षापासून भक्तनिवास भक्तासाठी वेळोवळी मागणी करूनही खुले न केल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नाशिक कार्यालयाकडून […]
कोपरगाव,दि.२४-साखर उद्योगातील शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (पुणे) यांच तर्फे राज्यामध्ये दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार तसेच राज्यामध्ये ऊसाचे सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात येते. गाळप हंगाम २०२४-२५ या वर्षाकरीता मध्य विभागातुन तांत्रिक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार हा साखर उत्पादन प्रक्रियेत उत्कृष्ट तांत्रिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर […]
वावी(वार्ताहर)– गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम सन २०२५-२६ करीता पाटबंधारे विभागाकडून अधिकृत जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. चालू रब्बी हंगामातील पिकांसाठी डावा व उजवा गोदावरी कालवा अंतर्गत नमुना क्रमांक सात पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नमुना नंबर ७ अर्जासोबत ७/१२ उतारा जोडून ६ जानेवारी २०२६ रोजी सायं ६ वाजे पर्यंत पाटबंधारे […]
वावी,दि.२३-येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच विजय काटे यांच्या करण्यात आले.मेळाव्यात खाऊ गल्ली,खेळ गल्ली व भाजीपाला गल्ली अशी रूपरेषा तयार करून विद्यार्थ्यांना आर्थिक सामाजिक जीवनातील कौशल्यवाढीची माहिती देण्यात आली. यावेळी बदली झालेल्या शिक्षकांना निरोप व नव्याने आलेल्या शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.बदली झालेल्या शिक्षकवर्गाकडून शाळेस आधुनिक माईक,स्पीकर भेट […]
कोपरगाव शहराच्या विकासासाठी अपक्ष आणि लोकसेवा आघाडीच्या नगरसेवकांना शहरविकासासाठी उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापतीपद देणार :आ.आशुतोष काळे कोपरगाव,दि.२२:- २०१६ च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात नगरसेवक निवडून येवून नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार विजयराव वहाडणे निवडून आले होते. त्यावेळी विकासाला पाठिंबा देण्यासाठी निवडून येताच वहाडणे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याही निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ७ वरून […]
कोपरगाव,दि.२१- प्रभावी वक्तृत्वात वक्ता आणि श्रोते यांच्यातील भावनिक, बौद्धिक व सामाजिक नाते दृढ होते. विचारांची स्पष्टता, विषयाची खोली आणि मांडणीतील प्रामाणिकपणा यांमुळे श्रोते केवळ ऐकत नाहीत, तर विचार करायला प्रवृत्त होतात. त्यामुळे वक्तृत्व म्हणजे नुसते बोलणेच नव्हे तर तो श्रोत्यांच्या मनाशी केलेला एक संवाद असतो असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे […]
गणेश ओझा,प्रतिनिधी नाशिक,दि.२०-के.के.वाघ स्मृतीचषक जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन भाऊसाहेबनगर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.स्पर्धेत नूतन विद्यालय व ॲड रावसाहेब शिंदे ज्युनिअर कॉलेज वावी विद्यालयाच्या १७ वर्ष व १९ वर्ष मुलांच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांकपटकावला.संघांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र बक्षीस म्हणून मिळाले. १७ वर्ष मुलांच्या संघात कर्णधार […]
कोपरगाव,दि.१९- जोपर्यंत कोपरगावकर पाण्यासाठी वणवण करतील तोपर्यंत आपल्या राजकीय साम्राज्याला धक्काच लागू शकत नाही ह्या गैरसमजातून विरोधकांनी २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची सभा घेवून कोपरगावकरांना पाणी देणार असल्याचे वदवून घेतले होते. मात्र स्वत: आमदार, राज्यात व केंद्रात त्यांचेच सरकार असतांनाही कोपरगावकरांना ते पाणी देवू शकले नाही हि वस्तुस्थिती आहे. मात्र चांगले झाले तर आम्ही केले […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१८-कहांडळवाडी चिंचोलीगुरव रस्त्यावर भाऊसाहेब भाऊराव गुंजाळ यांच्या गट क्र १४१/१/१ मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून ग्रामस्थांनी बिबट्या वनविभागाच्या स्वाधीन केला आहे.परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून वनविभागाने पिंजऱ्याची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.