कोपरगाव,दि.५- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ६ ते ७ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर होणार आहे.स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पूर्ण झाल्या असून गौतम पब्लिक स्कूल सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे.स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील आठ […]
सिन्नर,दि.४-तालुक्यातील वावी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून महिला व पुरुष भाविकांकडून गुरुचरित्राचे सामुदायिक पारायण केले जातआहे.सोहळ्यानिमित्त यज्ञ याग करण्यात येत असून त्यामध्ये महिला भाविकांकडून सेवा समर्पित केली जात आहे. दि.२७ नोव्हेंबर पासून पारायणास प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त प्रत्येक दिवशी विविध प्रकारचे यज्ञविधी करण्यात आले.प्रत्येक यज्ञविधी मध्ये […]
मुंबई,दि.३ -कोपरगाव मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकारचे अवैध धंदे खुले आम सुरू असून पोलीस प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख देखील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यावर तातडीने अंकुश लावावा अशी मागणी […]