कोपरगाव,दि.४ :- मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी आ.आशुतोष काळे यांनी वणी गडावरून आणलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे कोपरगाव शहरात गुरुवारी संत महतांच्या उपस्थितीत ढोल पथकांच्या गजरात, लेझीम व झांझ पथकाच्या तालात, भव्य दिव्य स्वरुपात आकर्षकरित्या सजविलेल्या पालखीतून जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या या भक्ती सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचे यावेळी दिसून आले. शहरातील चौकाचौकात […]