कोपरगाव,दि.३१- धार्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कोपरगाव तालुक्यात अनेक धार्मिक देवस्थान असून लाखो भाविकांचे ते श्रद्धास्थान आहेत. यात्रा उत्सव प्रसंगी दरवर्षी लाखो भाविक या धार्मिक स्थळी दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या देवस्थानांना ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला आहे. त्यामुळे देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळविण्याचा मार्ग मोकळा होवून तालुक्यातील चार देवस्थानांना ५० लाखाचा निधी मंजूर करून आणला होता. या विकास कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता […]
नाशिक,दि.३०-बाळू रामदास पवार रा.नांदगाव बुद्रुक यांच्या मळ्यातून दोन म्हशी व एक पायडू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत याबाबत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२९- नॅचरल उद्योग समुहातील नॅचरल डेअरीने नव्याने उत्पादित केलेले एनर्जी फ्लेवर्ड मिल्क हे आरोग्यासाठी उत्तम असल्याचे मत नॅचरल उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी व्यक्त केले.श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून नॅचरल उद्योगामध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली व त्याच वेळी नॅचरल डेअरीमध्ये नविन उत्पादित पाच प्रकारचे एनर्जी फ्लेवर्ड मिल्कचा विक्री प्रारंभ करण्यात […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२८-शिराढोण येथील क्रांतीनगर (पारधी वस्तीत) तहसीलदार हेमंत ढोकले यांनी कु.वेदा हिचा वाढदिवस वंचित समाजाच्या मुलांसोबत साजरा केला.या वेळी केक कापून वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तहसीलदार हेमंत ढोकले म्हणाले,आपल्या समाजाच्या दैनंदिन अडचणी जाणून घेतल्या असून त्या सोडविण्यासाठी ठोस […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२८-तालुक्यात आठ दिवसांत ३ वेळा मेंढ्या चोरीच्या घडलेल्या असताना वावी पोलिसांकडून तपासात दिरंगाई,गुन्हे दाखल करण्यास विलंब व पोलीस कर्मचाऱ्यांकडून मेंढपाळांना अपमानास्पद वागणूक दिल्याबाबत महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्यावतीने म्हाळोबा पाटी दोडी येथे दि.२९ रोजी सकाळी ११ वाजता धनगर बांधवाकडून शेळ्यामेंढ्यासह बिऱ्हाड घेऊन रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदार सागर मुंदडा यांना देण्यात […]
कोपरगाव,दि.२७:- उजनी उपसा सिचंन योजनेच्या टप्पा क्रमांक एकच्या शहापुर येथील ३१५ के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफार्मरमधील ऑईल व तांब्याच्या कॉईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्यामुळे जवळके, धोंडेवाडी, शहापूर, बहादराबाद या गावातील पाझर तलाव, साठवण बंधारे भरण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु बोले तैसा चाले या वचनाप्रमाणे २०१९ ला निवडून आल्यापासून आ.आशुतोष काळे यांनी दरवर्षी उजनी उपसा सिंचन योजना […]
सिन्नर,दि.२६-दोडी खुर्द शिवारातील झुंबर महादू आव्हाड यांच्या वस्तीवर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराच्या उघडया दरवाजातून प्रवेश करून पेटीत ठेवलेले दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन भार वजनाचे पैजन,वाळे व कडे असे चांदीचे दागिने चोरी गेल्याची घटना दि.२४ रोजी घडली असून रोजी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२५-गाळप हंगाम २०२४-२५ मधील खासगी साखर उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कार्याबद्दल नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर रांजणी कारखान्याला ‘राज्यातील सर्वाेत्कृष्ट कारखाना’ हया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हस्ते व विस्माचे अध्यक्ष बी. बी.ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे करण्यात आले.यावेळी महासचिव डॉ. पांडुरंग राऊत,डीएसटीएचे […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२४-तालुक्यातील दुसंगवाडी येथील आनंदा त्रंबक गोराणे हे मेंढपाळ व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात आज मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी जाळी तोडून कळपातुन २० मेंढ्या व जावळी चोरून नेली आहे त्यामुळे मेंढापाळामध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी होत आहे.
नाशिक,दि.२३-मुरंबी शिवारात शेल कंपनीच्या शांताई पेट्रोल पंपावर काळ्या रंगाचा बजाज पल्सरवर आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी कामगार गणेश मते याला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करीत पैश्याची बँग हिसकावून पळून गेल्याची घटना घडली असून वाडीवरहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक,दि.२२-जिल्ह्यातील नैताळे सबस्टेशन आवारातून १ लाख ५ हजार किंमतीच्या एल्युमिनियन कंडक्टर तारेची चोरी झाल्याची घटना घडली असून निफाड पोलीस ठाण्यात नवनाथ म्हसु घुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२२-तालुक्यातील वडांगळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून ग्राहकांसाठी वित्तीय समावेशन आणि कर्ज मेळावा विठ्ठल रुक्मिणी मंदीरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत खातेदाराच्या वारसदार बाळासाहेब शेळके, सुरेश भोर व रोहिदास विरनारायण यांना प्रत्येकी २ लाख विमा रक्कमेचे धनादेश विभागीय व्यवस्थापक राजेश देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले तसेच […]
कोपरगाव,दि.२१– कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने व संजीवनी रक्तपेढी कोपरगाव याच्या सहकार्याने संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी संस्थेचे विश्वस्त ज्ञानदेव मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२०- नॅचरल उद्योग समूहाच्या कार्यक्षेत्रातील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील या आनंदाचे क्षणी नॅचरल उद्योग समुहाने मांजरा धरणावर नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे आणि उप कार्यकारी अभियंता अभिजित नितनवरे यांचे हस्ते विधीवत पूजा करून जलपूजन करण्यात आले. जलपूजन प्रसंगी ठोंबरे म्हणाले या धरणाचा धाराशिव,बीड लातूर या तीन […]
कोपरगाव,दि.१९- आजच्या युगात महिलांनी केवळ घरापुरतेच मर्यादित न राहता आर्थिक विकासात सक्रिय योगदान देणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाल्यास त्यांना देखील उद्योजक म्हणून वाटचाल करता येवू शकते. हा उद्दात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी इंदिरा […]