कोपरगाव,दि.५ कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेचे विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस भव्य आमदार क्रीडा महोत्सव’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या मोबाईल, इंटरनेटचा वापर वाढला असून सध्याच्या पिढीचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. […]
नाशिक,दि.४- कोकणातील उल्हास खोऱ्यातील व वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने उल्हास-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचा उद्घाटन समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवारी सिंचन भवन नाशिक येथे मंत्री महोदय तसेच आमदारांच्या व असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आ.आशुतोष काळे देखील उपस्थित […]
सिन्नर,दि.३-रमेश रंगनाथ निरगुडे यांच्या घरासमोरुन मोटारसायकल क्र एम एच १५ डी डब्ल्यू ६८०४ ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव,दि.२-कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांचा सोमवार दि. ४ रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कोपरगाव मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आ.आशुतोष काळे महात्मा गांधी जिल्हा चॅरीटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल कोपरगाव येथे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. दरवर्षी आ.आशुतोष काळे यांच्या […]
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी शिराढोण,ता.१-सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यातील एकमेव नॅचरल उद्योग समूहातील श्री साई ग्रामीण सहकारी पतसंस्था आहे अशी माहिती लातूर येथील सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य भगवानराव ठोंबरे यांनी दिली. रांजणी ता.कळंब येथील श्री साई ग्रामीण पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली […]