सिन्नर,दि.९-तालुक्यातील वावी गांवचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा यात्रोत्सव उद्या शुक्रवार दि.१० पासून सुरू होणार असून दोन दिवस यात्रोत्सव चालणार आहे.
आज सायंकाळी ६ वाजता गावांतील तरुण गंगेचे पाणी आणण्यासाठी जाणार असून उद्या सकाळी ९ वाजता गंगेचे पाणी कावड मिरवणूक गावांतून निघणार आहे.त्यानंतर सकाळी ११ वाजता अभिषेक सत्यनारायण करून सायंकाळी ६ वाजता भव्य रथाची मिरवणूक निघून रात्री ९ वाजता शोभेची दारू उडवून होमहवन पूजा संपन्न होणार आहे.शनिवार दि.११ रोजी रात्री ९ वाजता मास्टर नाना सोनवणेसह सौ.कल्पना सोनवणे यांचा लोकनाट्य तमाशाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.