कोपरगाव,दि.६-स्व.माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांची १०५ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील स्मृती उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांकडून कर्मवीर शंकरराव काळे यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी त्यांच्या समवेत समाजकारणात सक्रीय सहभागी असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.