नगराध्यक्ष म्हणतात ढापे टाकले अन नगरपालिकेला माहिती नाही कुठे टाकले

कोपरगाव,दि.१२-कोपरगाव शहरात गेल्या शंभर दिवसांत केलेल्या विकासकामांचा पाढा वाचताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी पत्रकार परिषदेत शहरात गटारींवर ७२६ ढापे टाकल्याचा दावा केला होता. मात्र शहरात कुठे आणि किती ढापे टाकले याची अधिकृत माहिती नगरपालिकेकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. नगराध्यक्ष म्हणतात ढापे टाकले पण नगरपालिकेला माहितीच नाही कि कुठे टाकले असा भोंगळ कारभार पालिकेत सुरु […]

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण सुरूच

मुंबई,दि.११-सोने आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे २०५८ रुपयांची घसरण झाली असून १० ग्रॅम सोन्याचा दर १,५०,४४८ रुपयांच्या आसपास आला आहे.चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून ती […]

सार्वजनिक बांधकाम विभागाला डांबर मिळेना अन ग्रामस्थ ऐकेना

सिन्नर,दि.१०-वावी ते कहांडळवाडी रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला डांबर मिळत नसल्याने खड्डे बुजवण्यास कार्यक्षम नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने कहांडळवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले असून समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.

फळबाग उत्पादक सहकारी संस्थांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत समावेश करावा-आ.आशुतोष काळे

मुंबई,दि.१० :- आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र या कर्जमाफीचा फायदा कोपरगाव मतदार संघातील काही फळबाग उत्पादक सहकारी संस्थांना होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत कोपरगाव मतदार संघातील राहिलेल्या सर्व फळबाग उत्पादक सहकारी संस्थांचा समावेश […]

नांदूरशिंगोटे येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या,रोख रक्कमसह दागिने चोरीला

सिन्नर,दि.५-तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील तुषार अरुण मुंगसे व विकास भाऊसाहेब सोनवणे यांच्या घराचा कडी कुलूप तोडून १,११,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे.याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवप्रसाद ओझा यांचे दुःखद निधन

सिन्नर,दि.६-शिवप्रसाद सोमनाथ ओझा(वय ७२)रा.कानडी मळा,सिन्नर यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,तीन भाऊ,तीन बहिणी,नातू,पणतू असा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीस राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.डॉ.जयप्रकाश ओझा व पत्रकार सुधीर ओझा यांचे ते बंधू होत.

चार पिकअप गाडीच्या स्टेपनीची चोरी

नाशिक,दि.४-गणेश नामदेव बोडके रा.शिंपी टाकळी,ता. निफाड यांच्या घराजवळील शेडमधून चार पिकअप गाड्यांच्या लोखंडी डिस्क स्टेपनी टायरसह चोरीला गेल्याची घटना घडली असून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीत भीषण अग्नितांडवात २१ जणांचा दुदैवी मृत्यू

दिल्ली,दि.३-येथील हॉटेल लेमन ग्रीन या पंचतारांकीत हॉटेलला भीषण आग लागली असून त्यात होरपळून आतापर्यंत २१ जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.

सिन्नरच्या पूर्व भागात वरुणराजाचे आगमन

सिन्नर,दि.२-दुपारी २.३० च्या दरम्यान नांदूरशिंगोटे परिसरात सुरू झालेल्या पावसाने वावी,फुलेनगर,पांगरी शिवारात बरसायला सुरुवात केली असून वाऱ्याचा जोर जोरदार आहे.

तीन विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड

कोपरगाव,दि.१- कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची सैन्य दल आणि पोलीस दलात निवड झाली असून यामध्ये दोन विद्यार्थीनींचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अथक परिश्रमांच्या जोरावर जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत घेवून हे यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ […]