मुंबई,दि.११-सोने आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे २०५८ रुपयांची घसरण झाली असून १० ग्रॅम सोन्याचा दर १,५०,४४८ रुपयांच्या आसपास आला आहे.चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून ती ३,३५१ रुपयांनी स्वस्त झाली आहे.त्यामुळे एक किलो चांदीचा दर २,३६,२१० रुपयांवर आला आहे.