गणेश ओझा,प्रतिनिधी
सिन्नर,दि.२३-मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सायाळे शिवारातून एमएसडी फार्मासिटीकल प्रायवेट लिमिटेड,भिवंडी कंपनीचा ५२ बॉक्समध्ये असलेला २२ लाखांचा औषधाचा साठा चोरीस गेला आहे.याबाबत राकेश गांगुर्डे,ट्रान्सपोर्ट व्यवस्थापक( कल्याण पूर्व) यांनी वावी पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक कोळावळे करीत आहे.