सिन्नर,दि.२३-संविधान सन्मान समिती सिन्नर तालुका यांच्याकडून परभणी येथील पोलीस कोठडीत मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी,परभणी येथील संविधान शिल्पाची विटबांना करणाऱ्या नराधमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व बीड येथील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमूख मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा आशयाचे निवेदन सिन्नर तहसीलदार,सिन्नर पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाणे यांना देण्यात आहे.यावेळी गौतम खरात,संदीप भालेराव,राहुल जाधव,सतीश साबळे,शशिकांत आढागळे,अमोल जगताप,दौलत आढागळे, देविदास आढागळे,पप्पू गोडसे,सुनील जगताप,शरद जाधव, रोहित निकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते