टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड,४२ लाखांची झाडे जप्त

नाशिक,दि.१४-वणी पोलीस ठाणे हद्दीत भातोडे गावचे शिवारात काही संशयीत गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांना मिळाली त्यानुसार वणी पोलीसांनी भातोडे गावचे शिवारातील रंगनाथ सोनु चव्हाण, वय ५१, रा. भातोडे, ता. दिंडोरी, जि. नाशिक यांचे मालकीचे शेत गट क्रं. ८ याठिकाणी छापा टाकला. सदर छाप्यात २०९ किलो […]

नांदूरशिंगोटे येथून मोटारसायकल चोरीस

सिन्नर,दि.१३-तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पाठीमागील मोकळ्याजागेत उभी असलेली मोटारसायकल क्र एम एच १५ एच टी ६३४३ ही चोरीस गेली आहे.याबाबत वावी पोलीस ठाण्यात विलास अंबादास कदम यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास बलसाने करीत आहे.

धर्मनाथ काकडची प्रजासत्ताक संचालन पूर्व प्रशिक्षणासाठी निवड

कोपरगाव,दि.१२- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक धर्मनाथ बाबूराव काकड याची केंद्र सरकार युवा खेल,मंत्रालय महाराष्ट्र राज्य शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय प्रजासत्ताक संचालनपूर्व प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या […]

पुण्यस्मरणानिमित आधारतीर्थ आश्रमात मिष्ठानभोजन

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१०-पियुष सुभाष रणदिवे याचे वयाच्या चौथ्या वर्षी देवाज्ञा झाली त्याच्या पुण्यस्मरणानिमित दरवर्षी सुभाष मुरलीधर रणदिवे हे त्रंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम येथे मिष्ठानभोजन देत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करीत आहे. त्रंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम आत्महत्याग्रस्त शेतकरी मुला मुलीचा व शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीसाठी चालविण्यात येणारा महाराष्ट्रातील पहिला आश्रम आहे.पियुषच्या ३ ऱ्या पुण्यस्मरणानिमित याहीवर्षी मुलामुलींना […]

वावी येथील नूतन विद्यालयात गणित व विज्ञान प्रदर्शन संपन्न

गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.११-तालुक्यातील वावी येथील  नूतन विद्यालय व अँड रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत गणित व विज्ञान प्रदर्शन पार पडले.        शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांमध्ये गणित व विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे. विद्यार्थ्यांची तर्कशक्ती,प्रयोगशीलता,निर्णय क्षमता, निर्मिती कौशल्य वाढीस लागणे भावी जीवनात संशोधक होण्याची त्यांच्यामध्ये आवड निर्माण करणे इत्यादी उद्देश लक्षात घेऊन […]

बळवंत ढोमसेची कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड

कोळपेवाडी,दि.१०- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी बळवंत शरद ढोमसे याची कुस्ती स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड झाली असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या […]

कोळगावमाळच्या ५ ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे

गणेश ओझा,प्रतिनिधी वावी,दि.९-येथून जवळच असलेल्या कोळगावमाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मुक्ताबाई चंद्रे यांच्या मुलाच्या मनमानी कारभाराला त्रस्त होवून ग्रामपंचायतीत काम करणे अवघड झाल्याने तसेच व्यक्तीगत कारणाने तुळशीदास फकिरा भालेराव,वाल्मिक बाळासाहेब जुंधारे, आयशा निसार पठाण,रब्बाना निजाम पटेल व रंजना केशवराव कदम यांनी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा दिला आहे.     ग्रामपंचायतीच्या कामकाज,बैठक,विकासकामे आदींच्या निर्णयात सरपंच यांचा मुलाचा हस्तपक्षेप मोठ्या […]

इंटर हाऊस स्पर्धा सुरू 

कोळपेवाडी,दि.८- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल मध्ये दि. ७ डिसेंबरपासून संस्थेच्या सचिव सौ..चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरहाऊसेस स्पर्धा सुरू झाल्या आहेत.      गौतम पब्लिक स्कूल मधून उद्याचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने संस्था विश्वस्त आमदार आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे प्राचार्य […]

सिन्नर तालुक्यात चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

गणेश ओझा,प्रतिनिधी नाशिक,दि.७-२९नोव्हेंबर  रोजी सायंकाळचे सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येवुने पायी चालणारे एका महिला शिक्षीकेचे गळयातील सोन्याची पोत जबरीने चोरी करून चोरून नेली होती व २ डिसेंबर रोजी दुपारचेसुमारास सिन्नर – शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळ्या रंगाच्या  दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या दोन चोरटयांनी विनर टाऊनशिप, मुसळगाव येथे राहणारे एका महिलेची […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  अभिवादन

कोपरगाव,दि.६- समतेचा आदर्श उभारणारे, दलित, शोषित, पीडित वर्गांसाठी जीवन समर्पित करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि समानतेसाठी संघर्ष केला. त्यांच्या विचारांना […]

भरदिवसा घराचे कुलूप उघडून २ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरीला

नाशिक,दि.५-निवृत्ती पांडुरंग उगले रा.निमोण ता.चांदवड यांच्या बंद घराचे खिडकीमध्ये ठेवलेल्या चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश करीत कोठीचा कोयंडा तोडून त्यात ठेवलेला २ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.याबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघ करीत आहे.

पायी जात असताना २ तोळ्याची पोत ओरबडली

सिन्नर,दि.४-सिन्नर शिर्डी रस्त्यावर हॉटेल जयबाबाजीसमोर सुनीता किरण देसाई ह्या दुपारी १.१५च्या सुमारास पायी घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २०ग्रॅम वजनाची पोत हिसकावून नेली.याबाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.

बसप्रवासादरम्यान साडेतीन तोळ्यांच्या बांगडया लंपास

सिन्नर,दि.३-सिन्नर बस स्टँड ते दापुर एसटी प्रवासादरम्यान यमुनाबाई एकनाथ आव्हाड रा.दापुर यांच्या साडेतीन तोळे वजनाच्या २ बांगडया चोरीस गेल्या आहेत.याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार मानकर करीत आहे.

पाथरेजवळ ऊसाचा टॅक्टर व लक्झरीचा भीषण अपघात

  गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.२-सिन्नर शिर्डी रस्त्यावर पाथरे गावाजवळील वळणावर महावितरण कार्यालयासमोर ऊसाचा ट्रॅक्टर व लक्झरीचा भीषण अपघात झाला असून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

मंदिरात चोरी,४० हजारांचा ऐवज लंपास

सिन्नर,दि.१-पाटोळे येथील खंडेराव मंदिरातील पितळी व चांदीची मूर्ती, पितळी वाट्या,समई व घंटे असा ३९,८०० रुपयांचा ऐवज चोरीस केला आहे.याबाबत पूजारी आनंदा निवृत्ती खताळे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास हवालदार गणेश वराडे करीत आहे.