सिन्नर,दि.८-७ जानेवारीच्या मध्यरात्रीचे सुमारास तळेगाव दिघे, ता.संगमनेर येथील रहिवासी महिला ही नांदूरशिंगोटे येथे जाण्यासाठी एका पांढ-या रंगाचे पिकअप वाहनास हात दाखवुन नाशिकरोड येथुन प्रवासी म्हणून बसली होती. दरम्यान पिकअप वाहनावरील चालक व गाडीतील एक इसम यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर मोहदरी घाटामध्ये रोडच्या कडेला पिकअप गाडी थांबवुन, यातील प्रवासी महिलेस चाकुसारखे धारदार शस्त्राचा धाक दाखवुन […]
कोपरगाव,दि.७-नागरिकांची सरकारी कार्यालयात असणारी कामे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. काही नागरिकांची कामे वेळेत होतात परंतु काही नागरिकांच्या कामांमध्ये कागदपत्रांच्या अडचणी असल्यामुळे ही कामे वेळेत होऊ शकत नाही व काही वेळेस संबंधित अधिकाऱ्यातून देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, शेती आदी विषयांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच कोपरगाव शहरातील […]
राहाता,दि.६:-चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्यास सहमती दिली आहे. मात्र पाण्याची जास्तीत जास्त बचत करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा अशी आग्रही मागणी आ. आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असून त्या मागणीला जलसंपदा […]
कोपरगाव,दि.६– राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा प्रभाव केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे तर संपूर्ण समाजावर सकारात्मक ठरतो.त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होवून त्यांना समाजाच्या विविध समस्या कशा हाताळाव्यात याचे प्रात्यक्षिक राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून मिळते. हिवाळी शिबीरामुळे विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय समस्यांवर प्रत्यक्ष कार्य करण्याची संधी मिळते. त्यामुळे हे शिबीर केवळ विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भक्कम करण्याचे […]
नाशिक,दि-६-दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे गौतम यशवंत खरात यांना सामाजिक कार्य व बँक ऑफ महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कामगिरीबाबत राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे,भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आदि मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव,दि.६- मतदार संघातील जनतेला शासकीय कार्यालयात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिकमध्ये जनता दरबार घेवून असंख्य नागरिकांच्या समस्या सूटल्या आहेत.यापुढील काळातही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला असून उद्या मंगळवार दि.७ रोजी दुपारी २ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.५-तालुक्यातील कहांडळवाडी येथील भास्कर यशवंतराव कहांडळ यांच्या घराचे कुलुप बनावट चावीने उघडून खोलीतील पेटी विहिरीजवळ नेवून त्यातील २० हजार रोख रक्कम मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेली तर कपाट खोलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. वावी पोलिसांच्या हद्दीतील चोरीची आठवड्यातील ही पाचवी घटना असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव,दि.४:- मेंढेगिरी समितीच्या अहवालातील शिफारशी कालबाह्य झाल्याने त्याच्या आधारे ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले जावू नये अशा आशयाची जनहीत याचिका आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे सभासद भास्कर रखमाजी आवारे व इतर यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात सन २०२३ मध्ये दाखल केलेली आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने शासनास आदेश […]
सिन्नर,दि.४-रेझींग डे सप्ताहानिमित्त वावी पोलीस ठाणे व नंदकिशोर एज्युकेशन सोसायटी संचलित अर्पण रक्तकेंद्र,रक्तविघटन संशोधन केंद्र नाशिक यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचे आयोजन पोलीस ठाणे कार्यालयात करण्यात आले होते.शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे,उपनिरीक्षक प्रमोदसरोवर,उपनिरीक्षक घोडेचोरे हवालदार शहाजी शिंदे,सचिन कहाणे,डॉ.शैलेंद्र वैदय,सरला गोवर्धने,हर्षदा खैरनार, तेजल खैरे,शीतल शेलार,परिसरातील पोलीस पाटील ,ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
गणेश ओझा,प्रतिनिधी वावी,दि.४-आज सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सिन्नर शिर्डी रस्त्यावर वावी गावाजवळ अरविंद श्रीरामफल रा.ज्योतीबा नगर तळवाडे, पुणे यांच्या गाडीला थांबवून ईर्टिका गाडीतील चार अज्ञात चोरट्यांनी लोखंडी वस्तूचा धाक दाखवून मनोजकुमार चंदेला यांच्या पाकिटातील ५ हजार,लक्ष्मीदत्त त्रिलोचन कांडपाल यांच्या बॅगेतील २५ हजार,शांती लक्ष्मीदत्त कांडपाल यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र,मोनिका आशिष वर्मा यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व […]
नाशिक,दि.३-सन २०२४ मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे.गतवर्षात सुरळीत पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांचा बिमोड करून,सराईत गुन्हेगार व समाजविघातक कृत्य करणा-या इसमांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाया करून कायदा व सुवस्था अबाधित ठेवलेली आहे. दि.१/१/२०२४ […]
सिन्नर,दि.२-पांगरवाडी कक्ष क्र ५५८ क्षेत्र ४० मधील १४०० लोखंडी अँगलपैकी २८६ अँगल चोरीस गेल्याची घटना घडली असून सिन्नर पोलीस ठाण्यात सुजित बोकडे यांनी फिर्याद दिली आहे.
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१-तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी २ ठिकाणी चोरी झालेल्या घटना ताज्या असतानाच दोडी बु शिवारात दुपारी ३ वाजेच्या सुमारास शुभांगी बाळासाहेब आव्हाड ह्या घराचे समोर कपडे धुवत असतांना घराचे पाठीमागून आलेल्या ३ अनोळखी इसमापैकी एकाने गळ्याला चाकू लावीत धमकावून गळ्यातील सोन्याची साखळी व हातातील सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेतल्या तर […]