दांपत्याचे सोने व रोख रक्कम चोरणारा भामटा १२ तासांचे आत गजाआड करण्यात वावी पोलीसांना यश,पावणे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
गणेश ओझा,प्रतिनिधी
 
सिन्नर,दि.२२-दिल्लीमधील व्यापारी असलेले कमल रतनलाल अग्रवाल वय ५४ वर्ष हे त्यांची पत्नी व त्यांचे नातेवाईकांसह महाराष्ट्रात फिरण्याठी आलेले असतांना दि.२० जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथुन तन्वी ट्रेव्हल्स गाडीने नाशिककडेसमृध्दीमहामार्गाने येत असतांना समृध्दी महामार्गावरील म-हळ बु ता.सिन्नर जि नाशिक येथे असलेल्या सर्विस रोडवरील हॉटेल दक्षीण दन भारत मध्ये दुपारी १३.०० वा सुमारास जेवणाठी थांबले होते. तेव्हा फिर्यादी यांचे पत्नीकडे असलेल्या लेडीज पर्समध्ये रोख रक्कम व सोन्याचे किंमती ऐवज असल्याने त्यांनी सदरची लेडीज पर्स जेवन करतेवेळी खबरदारी म्हणुन टेबलच्या खाली ठेवली जेवन केल्यानंतर सदर दांपत्य नाशिक येथे निघुन गेले नाशिक येथे पोहचल्यानंतर गाडीतील सामान काढतांना गाडीत पत्नीची पर्स नसल्याचे त्यांचे लक्षात आलेनंतर व ती समृध्दीहॉटेलमध्ये टेबलच्या खालीच विसरल्याचे त्यांचे लक्षात आलेनंतर ते पुन्हा सदर हॉटेलमध्ये येउन चौकशी केली असता तेथे पर्स मिळुन आली नाही सदर पर्समध्ये ७५ हजार रुपये रोख रक्कम, १ लाख ५० हजार रुपये किंमतीची एक डायमंड रिंग, २ लाख रु किंमतीची एक डायमंड रिंग, ६०,००० हजार रुपये किंमतीचे दोन टीसॉट कंपनीचे लेडीज घडयाळे असा एकुण ४ लाख ८५ रुपये किमतीचा मुददेमाल अज्ञात चोरटयाने चोरुन नेले  बाबत वावी पोलीस स्टेशन येथे । गुरन ३० / २०२५ भारतीय न्याय संहीता चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    विक्रम देशमाने पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण,आदीत्य मिरखेलकर अपर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण,निलेश पालवे उपविभागीय पोलीस अधीकारी निफाड उपविभाग यांनी घटनेसंदर्भाने तात्काळ आढावा घेऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली व दिलेल्या सुचनांप्रमाणे वावी पोलीस स्टेशन येथे तात्काळ तपास पथके तयार करुन सदर पथकाकडुन गुन्हयाचा तपास करण्यात आला असता घटनास्थळी दक्षीण दन भारत हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक तसेच हॉटेलमध्ये कामास असलेल्या सर्व कामगारांकडे कसून चौकशी करण्यात आली चौकशीत सदर गुन्हा हा हॉटेल मधील कॅशीयर रवि राज रेडडी वय ४० वर्ष मुळ रा प्लॉट न ३७५, महेंद्रनगर, नागपुर याने चोरी केल्याची कबुली दिली.त्याप्रमाणे सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.आरोपी यांने चोरलेला मुददेमालहा हॉटेलमध्येच एका खोलीत लपवुन ठेवला होता सदर मुददेमाल
आरोपीकडुन हस्तगत करण्यात आला असुन त्यात फिर्यादीची लेडीज पर्स त्यामध्ये ६५ हजार रुपये रोख रक्कम,१ लाख ५० हजार रुपये किंमतीची एक डायमंड रिंग, २ लाख रु किंमतीची एक डायमंडरिंग,६०,००० हजार रुपये किंमतीचे दोन टीसॉट कंपनीचे लेडीज घडयाळे असा एकुण ४ लाख ७५ रुपयेकिमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
      सदर गुन्हाहा विक्रम देशमाने पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण,आदीत्य मिरखेलकर अपर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, निलेश पालवे, उपविभागीय पोलीस अधीकारी निफाड उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वावी पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोउनि विजय कोठावळे, पोहवा सतिष बैरागी, पोहवा अजय महाजन, पोहवा साहेबराव बलसाने, पोहवा शहाजी शिंदे, पोहवा बाबसाहेब शिंदे, पोहवा सचिन कहाणे, पोना कैलास गोरे, पोना देविदास माळी, पोशि किरण पवार, पोशि नवनाथ आडके, पोशि विक्रम लगड, पोशि तुषार दयाळ यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणला पुढील तपास उपनिरीक्षक विजय कोठावळे करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *