२०२६ मधील फेब्रुवारी-मार्चमध्ये अधिक लगीनघाई असणार-डॉ.भूषण संजय रत्नाकर गुरुजी

author
0 minutes, 1 second Read
Spread the love
 
नाशिक,दि.१५- सन २०२५ मध्ये लग्नसराईसाठी तुरळक मुहूर्त असून शुक्र ग्रहाचा अस्त काळ १४ डिसेंबर  २०२५ ला सुरु होत असून २० जाने २०२६ पर्यंत हा कालावधी असणार असल्याची माहिती ज्योतिषाचार्य डॉ.भूषण संजय रत्नाकर गुरुजी यांनी दिली.
 
 
     १६ डिसेंबर २०२५ नंतर २० जानेवारी २०२६ पर्यंत पौष महिना असल्याने विवाहाचे शास्त्रसंमत मुहूर्त नाहीत.दिवाळी नंतर म्हणजेच तुळशी विवाहानंतर २२ नोव्हेंबर हा पहिला मुहूर्त असुन नोव्हेंबरमध्ये सहाच मुहूर्त आहेत तर डिसेंबरमध्ये दि. २ व ५ असे दोनच मुहूर्त आहेत. यापुढे अस्तकाळ  संपाल्यानंतर ३ फेब्रुवारी २०२६ पासून भरपुर मुहूर्त आहे.
 
 
              अस्तकाळात म्हणजे आपत्काळात,गौणकाळात
अतिसंकटकाळी देखील दाते पंचांगात मुहूर्त देण्यात आले आहेत परंतु अडचणीचे प्रसंगी यजमानांच्या सोईकरीता अस्तंगत ग्रहाचे पूजन करुन् संकटकाळी काही मुहूर्त आपल्याला घेतायेतात.त्यासाठी  गुरु‌जींचे मार्गदर्शन घ्यावे असे मत ज्योतिषाचार्य डॉ.भूषण संजय रत्नाकर गुरुजी यांनी व्यक्त केले.
 
दाते पंचांगातील नोव्हेंबर मधील मुहूर्त-
 
नोव्हेंबर २०२९- दि.२२, २३, २५, २६, २७, ३०
 
डिसेबर २०२५ – २,१२
 
फेब्रु. २०२६- ३,५,६,७,८,१०,११,१२, २०, २२, २५,२६
 
मार्च – ३,५,७, ८, १२, १४, १५, १६
 
पुढे चैत्र महिन्यात मुहूर्त नसून चैत्रानंतर मुहूर्त आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *