कोपरगाव,दि.५- केंद्रीय गृहमंत्री तथा पहिले केंद्रीय सहकारमंत्री ना.अमित शाह यांचे रविवार दि.५ रोजी लोणी व कोपरगाव येथे विविध कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमांसाठी ना.अमित शाह यांचे समवेत पूर्व संध्येला राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ, महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना.सौ.पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांचे देखील आगमन झाले असता त्यांचेही कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने आ.आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत केले.