गणेश ओझा,प्रतिनिधी
सिन्नर,दि.९-राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमत्त सिन्नर तालुका शिवसेनेच्यावतीने वावी येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना वही,पेन,बिस्कीट,केळी वाटप करण्यात आले.अनाथ मुलांना भेटवस्तू देवुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सिन्नर योगेश म्हस्के,युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम कुटे,गटप्रमुख कैलास घोटेकर,अनिकेत काटे,अभी पगार,विशाल कुटे,भैया तळेकर,धनंजय थोरात, गणेश सैंद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.