पूर संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
कोपरगाव,दि.१५:- राजकारणात फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामे करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मागील सहा वर्षात विकासकामांवर भर देवून दशकानुदशके प्रलंबित असलेली विकास कामे पूर्ण केली असून राजकारण विकासाचे करतो आणि जे करतो तेच जनतेसमोर मांडतो असे स्पष्ट मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले आहे.