वावी येथील मोटारसायकल चोरणारा स-हाईत गुन्हेगार गजाआड

author
0 minutes, 3 seconds Read
Spread the love
सिन्नर,दि.२-तालुक्यातील वावी पोलीस स्टेशन हददीतील मोटारसायकल चो-यांच्या घडत असलेल्या घटनासंदर्भाने बाळासाहेब पाटील पोलीस अधिक्षक, आदीत्य मिरखेलकर अपर पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, निलेश पालवे उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभाग यांनी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत सुचना केल्या होत्या.त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी  पोलीसांचे विशेष तपास पथक स्थापन केले होते.
 वावी पोस्टे गुरन ३६ / २०२५ BNS ३०२ (२) या गुन्हयातील फिर्यादी फिरोज इस्माईल मनियार वय २९ रा वावी ता सिन्नर जि नाशिक यांची वावी येथुन घरासमोरुन दि. २७/०१/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास यामाहा कंपनीची एमटी १५ मोटार सायकल क्र. एम एच १७ सी टी १२७६ अशी अज्ञात चोरटयाने चोरुन नेलेल्या मोटार सायकलचा नमुद विशेष पोलीस पथकाने तपास करूनसदरगुन्हयातील आरोपी गणेश गोरखनाथ दरेकर वय २० वर्ष रा. पिंपळगाव जलाल ता येवला जि नाशिक यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
    नमुद आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करता
त्याने नमुद गुन्हयातील यामाहा मोटार सायकल व्यतीरिक्त कोपरगाव शहरातुन चोरलेली रॉयल इनफील्ड बुलेट चेसी नं ME3U355C0FN964263 मोटार सायकल तसेच आडगाव नाशिक येथुन चोरलेली होंडा शाईन चेसी नं
ME4JC65DJKDO97649 अशा मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. नमुद आरोपीविरोधात नाशिक जिल्हयातील येवला शहर, तसेच त्रंबकेश्वर पोलीस ठाणे व अहिल्यानगर जिल्हयातील राहता पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.
    सदर गुन्हयात बाळासाहेब पाटील पोलीस अधिक्षक,
आदीत्य मिरखेलकर अपर पोलीस अधिक्षक, निलेश पालवे उपविभागीय पोलीस अधीकारी निफाड उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वावी पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोउनि किरण सोनवणे तसेच विशेष पथकातील पोअंम गणेश पवार, पोअंम सागर सारंगधर यांच्या पथकाने सदर कामगिरी केली. पुढील तपास पोउनि किरण सोनवणे हे करीत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *