जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
शिराढोण,ता.१-सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी लातूर धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यातील एकमेव नॅचरल उद्योग समूहातील श्री साई ग्रामीण सहकारी पतसंस्था आहे अशी माहिती लातूर येथील सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य भगवानराव ठोंबरे यांनी दिली.
रांजणी ता.कळंब येथील श्री साई ग्रामीण पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळी प्राचार्य ठोंबरे बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कृषी भूषण पांडूरंग आवाड होते.श्री आवाड म्हणाले यावर्षी पतसंस्थेला ४ कोटी सहा लाख ७४ हजार रुपये नफा झाला असून बँकेच्या सभासदाना पंधरा टक्के लाभांश देण्यात येणार आहे.
आवाड म्हणाले,संस्थेच्या ५६ कोटी ९९ लाख रुपयांच्या ठेवी असून २७ कोटी ३३ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.संस्थेचे २८०० सभासदांचे एक कोटी १५ लाख ९२ हजार रुपये भाग भांडवल आहे. तर वसूली ९९•८६ टक्के आहे.
यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दहा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले तसेच संस्थेच्या दोन सभासदांना दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत देण्यात आली.या कार्यक्रमास नँचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे,एन साई मल्टी स्टेट बँकेचे उपाध्यक्ष किशोर डाळे,पतसंस्थेचे उपाध्यक्ष हर्षल ठोंबरे,व्यवस्थापक विठ्ठलराव शितोळे,सहकार प्रशिक्षण केंद्र लातूरचे प्राचार्य भगवान ठोंबरे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयीन अधिक्षक बालाजी चिंचोले,लेखापरिक्षक बालाजी जाधव,दिलीपराव भिसे,विष्णू मोहिते, अनिल काळदाते,मदन वाघमारे,जब्बार पठाण,सौ अलका आगळे,सौ.रेश्मा साळूंके उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक विठ्ठलराव शितोळे यांनी केले.तर डॉ सर्जेराव साळूंके यांनी आभार मानले.