सिन्नर,दि.१५-तुषार आण्णा सूर्यवंशी रा.नांदुरडी,ता.निफाड यांच्या मालकीची मोटारसायकल क्र.एम एच १५ एच पी १९९९ ची खोपडी खुर्द येथून भरदुपारी चोरीस गेल्याची घटना घडली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव,दि.१४- महायुती शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व जलसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असणाऱ्या जलसंपदा विभागाच्या ‘जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवार दि.१५ रोजी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जल व्यवस्थापनाच्या शाश्वत योजना राबवून नागरीकांमध्ये जल साक्षरतेचे महत्व पटवून […]
नाशिक,दि.१३-नांदुरी पायथा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत दर्शन नरेंद्रकुमार धाडीवाल रा.पाथर्डी फाटा,नाशिक यांच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाची चैन चोरट्यांनी लंपास केली आहे.याबाबत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार शेवाळे करीत आहे.
कोपरगाव,दि.१२- सुरेगाव येथील सौ. सुलोचना सत्यनारायण बोलगमवार यांचे नुकतेच वयाच्या ५९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे जावई असा परिवार आहे. हॉटेल आकाश गंगाचे संचालक व्यंकटेश बोलगमवार व प्रसिद्ध विधीज्ञ ऍडव्होकेट प्रकाश बोलगमवार यांच्या त्या मातोश्री होत.
कोपरगाव,दि.११:- कोपरगाव मतदारसंघातील जेऊर कुंभारी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी कमी पडत असलेला अधिकचा निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून अधिकच्या ०१ कोटी रुपये निधीस महायुती शासनाने मंजुरी येवून जेऊर कुंभारी पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन १० कोटी ९१ लक्ष रुपये निधीची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव […]
कोपरगाव,दि.१०- जिथे जिवंत माणसाला दिलेल्या वचनांचा विसर पडतो तिथे ज्या व्यक्ती आपल्यात नाही त्यांना दिलेल्या वचनाचा तर कोणीच विचार करत नाही. मात्र हा समज आ.आशुतोष काळे यांनी खोटा ठरविला असून माझे चुलते स्व.शांतीलाल पवार यांना दिलेला शब्द पूर्ण करून मला सरपंचपदाची संधी दिली. राजकारणात दिलेला शब्द पाळणारा नेता हा विश्वास, समर्पण आणि प्रामाणिकतेचं प्रतीक असून […]
सिन्नर,दि.९-पांढुर्ली विंचूर दळवी रोडवर कडवा कॅनॉललगत असलेल्या कैलास भोर यांच्या दुकानासमोर पोलीस असल्याची बतावणी करीत अंगावरील ८ तोळे दागिने स्कार्पमध्ये ठेवण्यास सांगून हातचलाखीने लंपास केल्याची फिर्याद सिन्नर पोलीस ठाण्यात बहिरु दळवी यांनी दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक संजय गोसावी करीत आहे.
सिन्नर,दि.८-अभिनव सुभाष जाधव रा.कमलनगर,सिन्नर यांच्या घराच्या दरवाजाचे कडीकोंडा व कुलूप तोडून कपाटातील अडीच तोळे वजनाचे गंठण,दीड तोळे वजनाच्या अंगठ्या व सव्वा तोळे वजनाचे मिनी गंठण चोरट्यांनी चोरून नेले असून सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक,दि.७-दर्शन भुपेश निकम रा.साईबाबानगर,दाभाडी ता. मालेगांव यांचे बंद घराचे कुलूप दुपारी १२ ते २.३० च्या दरम्यान चोरट्यांनी तोडून २३ हजार रोख रक्कम,३ तोळे सोन्याची मंगळपोत व ६ ग्रॅम कानातील रिंग असा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत मालेगांव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर,दि.६-नवनाथ भागवत गायकवाड रा.नांदूरशिंगोटे यांची मोटारसायकल क्र.एम एच १७ ए एच ०३१० ची साईश्रद्धा हार्डवेअरसमोरून चोरी झाली असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव,दि.५ :- जिल्हा समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास २०२४-२५ योजनेअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील विकास कामांकरीता ५० लक्ष रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती शासनामार्फत आ.आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे. मतदार संघाच्या झालेल्या विविध विकास कामातून […]
कोपरगाव,दि.४कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक–संचालक, शिक्षण, सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि आणि नेतृत्वाचा ठसा उमटविणारे माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०४ व्या जयंती निमित्त रविवार दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती-उद्यान गौतमनगर येथे व सकाळी १० वाजता पंचायत समिती कोपरगाव येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार […]
सिन्नर,दि.३-रामनवमीनिमित्ताने राज्यातून येणाऱ्या साईभक्तांमुळे सिन्नर शिर्डी रस्ता फुलला आहे….
सिन्नर,दि.२-तालुक्यातील खंडागळी येथील समाधान दिलीप महाले यांची मोटारसायकल क्र.एम एच १५ जे क्यू ६२३४ ही कुणाल ठोक यांच्या घरासमोरून चोरीस गेली आहे. तर दुसऱ्या घटनेत वडांगळी येथील समीर राजेंद्र खुळे यांची मोटारसायकल क्र.एम एच १५ जे पी ५१५८ त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली आहे.याबाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव,दि.१- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली गौतम सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नेत्रदीपक कामगिरी करतांना विक्रमी १ कोटी १७ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संजय आगवन, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण […]