author

वावी-लॉकर तोडून सव्वा तोळे सोने लंपास

वावी,दि.८-श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक गोंदे येथील दिलीप पंडीत निकम यांच्या घराचे कुलूप तोडून लाकडी लॉकरमधील ७ ग्राम वजनाचे झुबे व ५ ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील वेल चोरीस गेले आहेत.     याबाबत वावी पोलीस ठाण्यात दिलीप निकम यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास हवालदार बलसाने करीत आहे.

पवार साहेबांवर केलेल्या टीकेचा आ. आशुतोष काळेंकडून निषेध

कोळपेवाडी,दि.७- शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याबद्ल मला मनस्वी नितांत आदर असून सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या पातळीवरील केलेली टीका महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करू शकत नाही आणि हि महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती देखील नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा […]

वावी-घराचे कुलूप तोडून २६ हजार चोरीला

वावी,दि.६-येथून जवळच असलेल्या धारणगाव येथील मंगल भागवत झाडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून पंचपात्रीत ठेवलेले २६ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.    याबाबत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गोरे करीत आहे.

सिन्नर-बैठक संपवून निघालेल्या उपसभापतीची पोत ओरबडली

सिन्नर,दि.२८-कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठक संपवुन मोटारसायकल क्र एम एच १५ एच डी ५०९२ ने जात असताना सिन्नर गेट हाऊससमोर रस्त्यावर अडीच तोळे वजनाची पोत बळजबरीने  अज्ञात दोन व्यक्तींनी हिसकावून नेल्याची फिर्याद उपसभापती सिंधू केशव कोकाटे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक टकले करीत आहे.

गौतमच्या हॉकी संघाला विभागीय हॉकी स्पर्धेमध्ये दुहेरी मुकुट

कोळपेवाडी,दि.२७:-गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर विभागीय शालेय हॉकी स्पर्धा दि. २६ व २७  ऑक्टोबर रोजी पार पडल्या. ही स्पर्धा १४ व १७ वर्षे वयोगटात खेळवली गेली. या स्पर्धेचे उद्घाटन गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हॉकी […]

आ.आशुतोष काळे उद्या भरणार उमेदवारी अर्ज, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे व राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे राहणार उपस्थित

कोळपेवाडी,दि.२४- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. आशुतोष काळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (अजितदादा पवार गट) उद्या  शुक्रवार दि.२५ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,राष्ट्रवादीचे नेते व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहे.  

सिन्नर-आयुष्यमान आरोग्य मंदिरातुन संगणकाची चोरी

सिन्नर,दि.२३-तालुक्यातील शिवडे गावातील आयुष्यमान मंदिरातील संगणक चोरीस गेल्याची घटना घडली असून सिन्नर पोलीस ठाण्यात धनंजय पांडुरंग उदावंत यांनी फिर्याद दिली आहे.पुढील तपास हवालदार राहुल इंगोले करीत आहे.

गौतम पब्लिक स्कूलच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे असंख्य गुणवान विद्यार्थी घडतात

कोपरगाव,दि.२२- गौतम पब्लिक स्कूल हे शिक्षण क्षेत्रातील अतिशय विश्वासार्ह नाव आहे. दिवसेंदिवस गौतम पब्लिक स्कूलची शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली असून गौतम पब्लिक स्कूलच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे असंख्य गुणवान विद्यार्थी घडत असल्याचे प्रतिपादन गौतम पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी विजयराव जाधव यांनी केले आहे. गौतम पब्लिक स्कूल मध्ये नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात […]

राष्ट्रवादीकडून आ.आशुतोष काळेंची उमेदवारी जाहीर

कोपरगाव,दि.२१:- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (अजितदादा पवार गट) उमेदवारी जाहीर करण्यात येवून त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली असून शुक्रवार (दि.२५) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली. महाराष्ट्र […]

नाशिक ग्रामीण पोलीसांची अवैध व्यवसायांविरोधात धाडी

नाशिक,दि.२०-महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आली असून त्या पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे मा.विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली  नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फेअवैध व्यवसायांविरोधात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत […]

वावीजवळ मोटारसायकलवरून पडून तरुणाचा मृत्यू

वावी,दि.१८-सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी गावाच्यापुढे हॉटेल रामदेव बाबासमोर मोटारसायकलने घरी पाथरेकडे जात असताना मोटारसायकलवरून  पडल्याने दिपक राजेंद्र माळी हा गंभीर जखमी झाला त्याला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या संकटकालीन पथकाचे दुर्गेश शिंदे उपचारासाठी सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.      याबाबत वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून […]

मिठसागरेत दोन ठिकाणी चोऱ्या,सोनेचांदीसह रोख रक्कम लंपास

  गणेश ओझा,प्रतिनिधी वावी,दि.१६-येथून जवळच असलेल्या मिठसागरे येथे मध्यरात्रीच्या सुमारास सागर अशोक कासार यांच्या घरातील ४ ग्राम वजनाची पोत,५.५ भार वजनाची सरी व वाळे व रोख रक्कम ५ हजार असा ऐवज चोरट्यांनी चोरला ही बाब कासार यांच्या लक्षात येताच चोरी झालेल्या वस्तूंचा आजूबाजूला शोध घेत असताना शरद सूर्यभान कासार यांच्या घरातील ५ ग्राम वजनाची अंगठी […]

 १५ कोटी रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण  

कोपरगाव,दि.१५:- कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून विविध रस्त्यांसाठी १५ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव मतदार संघाचा विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष काळे यांनी चेहरा […]

गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय आगवन यांची निवड

कोळपेवाडी,दि.१४– सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक अशी ओळख असलेल्या गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय कारभारी आगवन यांची एकमताने निवड करण्यात आली. गौतम सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुधाकर दंडवते यांचे काही महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाल्यामुळे रिक्त असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गौतम सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा सोमवार (दि.१४) रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली. संजय कारभारी आगवन यांची चेअरमन पदाची […]

‘बालसंगोपन’ योजनेतील लाभार्थ्यांना मदतीचा हात

कोपरगाव,दि.१३:- अनाथ, एकपालक, निराश्रित, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने राज्य शासनाकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविली जात आहे. ज्याप्रमाणे राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यात आ.आशुतोष काळे आघाडीवर आहेत त्याप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा देखील लाभ मतदार संघातील पात्र लाभार्थ्यांना मिळवून […]