बाळासाहेब मराळे यांना राज्य शासनाचा डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रधान

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
गणेश ओझा,प्रतिनिधी
सिन्नर,दि.५-येथून जवळच असलेल्या शहा येथील बाळासाहेब मराळे हे १९९९ सालापासून शेवगा पिकाची शेती करतात .शेती बरोबरच त्यांनी विविध प्रयोग व संशोधन करून शेवगा पिकाचा राज्यातील शेतकऱ्यांना प्रचार आणि प्रसार केला. शेवगा लागवड ,छाटणी ,खत व्यवस्थापन याविषयी मराळे यांनी शेवगा पॅटर्न विकसित केला आहे . तसेच  शेवग्याचा  रोहित -१ हा वान  विकसित केला. शेवगा लागवड विषयी दोन पुस्तके लिहिली आहे.
     त्यांच्या शेतातील पंचवीस वर्षात दोन लाख शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहे. २०१२ मध्ये त्यांनी जर्मनी, स्विझर्लंड, ऑस्ट्रेलिया, व नेदरलँड या देशांना भेटी देऊन तेथील शेतीचा अभ्यास केला आहे .यापूर्वीही त्यांना जिल्हा राज्य व देश पातळीवरील वीस पुरस्कार मिळाले आहे .२५ वर्षे कार्यरत राहून त्यांनी या पिकाचे व्यापारी महत्त्व सिद्ध केलं या सर्व कामाची दखल घेऊन शासनाने त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
                 यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ,कृषिमंत्री धनंजय मुंडे ,आमदार विक्रम काळे, फलोत्पादन संचालक कैलास मोते, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *