श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग आत्मबल आणि श्रद्धेचे प्रतीक –आ. आशुतोष काळे

कोपरगाव,दि.३० परमपूज्य श्री श्री रवीशंकरजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून हजारो वर्ष जुन्या असलेल्या श्री सोरटी सोमनाथच्या मुळ ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे माझे परमभाग्य असून श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग आत्मबल आणि श्रद्धेचे प्रतिक असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले. शहरातील साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या हॉलमध्ये परमपूज्य श्री श्री रवीशंकरजी महाराज […]

श्री भगवान जगन्नाथाचे आ. आशुतोष काळेंनी घेतले आशिर्वाद

कोपरगाव,दि.२९- संपूर्ण देशात धार्मिक सण-उत्सवाप्रमाणे काढण्यात येणारी श्री भगवान जगन्नाथ यात्रा मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी रविवारी कोपरगावमध्ये काढण्यात आली होती. या रथ यात्रेत आ. आशुतोष काळे यांनी सहभागी होवून सेवा करून श्री भगवान जगन्नाथाचे मनोभावे पूजन करून आशिर्वाद घेतले. मागील कित्येक शतकापासून ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे भगवान श्री जगन्नाथाची भव्य दिव्य रथयात्रा काढण्यात येते. हा […]

पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची क्यूआर कोड सुविधा प्रगतीचे द्योतक

कोपरगाव,दि.२८- पतसंस्था क्षेत्रात नावाजलेल्या कोपरगाव तालुक्यातील पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने डिजिटल व्यवहाराकडे अजून एक पाऊल पुढे टाकतांना आपल्या ग्राहकांसाठी क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली हे प्रगतीचे द्योतक असून व्यापाऱ्यांनी व्यवसाय वाढीसाठी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व्यवहार करावेत असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले. पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने सुरु […]

वावी येथे हायमास्टचा लोकार्पण सोहळा संपन्न

  सिन्नर,दि.२७-तालुक्यातील वावी येथील कब्रस्तानामध्ये माजी पंचायत समिती सदस्य उदय सांगळे यांच्या प्रयत्नातून सोलर पॅनलचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार हायमास्ट बसवण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा उदय सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला.कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी गणेश वेलजाळी,अनंत मालपाणी,फरीद अत्तार,ईलाहीबक्ष शेख,युसूफ पठाण,सलमान शेख,भावड्या दळवी,नितीन घेगडमल आदी उपस्थित होते.

कृषी विभागाकडून शिराढोण येथील शेतकरी गटाला सोयाबीन बियाणे वाटप

जगदीशचंद्र जोशी,विशेषप्रतिनिधी धाराशिव,दि.२७- कळंब तालुक्यातील शिराढोण येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेमधून शेतकरी गटातील २५ शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले.             तालूका कृषि अधिकारी भागवतराव सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेमधून शिराढोण येथील एका शेतकरी गटास अनुदानावरील बियाणे देण्यासाठी सहाय्यक कृषि अधिकारी पद्मसिंह गायकवाड यांनी […]

मूलभूत ऊस बेणे वापरून सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करा-बी.बी.ठोंबरे

जगदीशचंद्र जोशी,धाराशिव विशेषप्रतिनिधी धाराशिव,दि.२७- नॅचरल उद्योग समूहाच्या कार्यक्षेत्रात मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे विहीर बोअरवेलला मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे आडसाली ऊस लागवड हंगाम २०२४-२५ मधील उसाची समाधानकारक वाढ झाली आहे. तसेच शेतकरी आडसाली ऊस लागवडीचे नियोजन करत आहेत. नॅचरल शुगर कारखाना कार्यक्षेत्रातील लागवड झालेल्या आडसाली आणि पूर्व हंगामी ऊस पिकाची पाहणी तसेच ऊस लागवड हंगाम २०२५-२६ […]

अवैधरित्या गांजाची विक्री करणारे इसमावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,पावणे पाच लाखांचा गांजा जप्त

नाशिक,दि.२६-नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकांने पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारे इसमावर छापा टाकून कारवाई केली आहे.     पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. […]

घरफोडी करीत दीड लाख रोख रक्कमसह चार तोळे सोने चोरीस

  नाशिक,दि.२५-महेंद्र गुलाब काळे रा.हाटकर वस्ती कासारी,नांदगाव यांच्या व शेजारच्या घराचे कडी कोंडा तोडून पत्र्याचे पेट्यामध्ये ठेवलेले दीड लाख रोख रक्कम ,चार तोळे वजनाचे दागिने व चांदीच्या वस्तू चोरट्यांनी चोरून नेले आहे.याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहस्थ कुंभमेळा रस्ते विकासात कोपरगाव मतदार संघाच्या रस्त्यांचा समावेश

कोपरगाव,दि.२४- पुढील वर्षीच्या कुंभ मेळाव्याला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना रस्त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या विकास आराखड्यात कोपरगाव मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश करण्याची आ.आशुतोष काळेंची मागणी मान्य करण्यात आली असून त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. कोपरगाव मतदार संघातील महत्वाच्या असणाऱ्या बहुतांश […]

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

कोपरगाव,दि.२३- महाराष्ट्र राज्यात तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाचा शेकडा निकाल […]

वावी ते संगमनेर बस सेवा सुरू करा-विघ्नहर्ता प्रतिष्ठानची मागणी

    सिन्नर,दि.२२-वावी ते संगमनेर बस सेवा सुरू असताना अचानक काही महिन्यांपूर्वी बससेवा परिवहन मंडळाकडून बंद करण्यात आल्याने नागरिकांचे हाल होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सिन्नर आगाराची लासलगाव ते संगमनेर ही बससेवा वावी मार्गे सुरू करावी तसेच वावी संगमनेर बससेवा सुरू करावी अशा आशयाचे निवेदन वावी येथील वाहतूक नियंत्रक यांना विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष […]

गौतम पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कोपरगाव,दि.२१-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय परिसर चैतन्याने भरून गेला होता. शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी आपली जीवनशैली योगमय करून नियमित योग साधना केली पाहिजे. आपले शरीर आणि मन सुंदर घडवायचे असेल, तर प्रत्येकाने दिवसाची सुरवात […]

माहेगाव देशमुखच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

कोपरगाव, दि.२०- मा.खा.स्व.कर्मवीर शंकरराव काळे व स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या कृपा आशीर्वादाने मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या प्रेरणेतून मागील वर्षापासून श्री क्षेत्र माहेगाव देशमुख ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मागीलवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी मा.आ.अशोकराव काळे यांनी विधिवत श्री गुरुदत्त महाराजांचे परमभक्त असलेल्या गवळीरामबाबांच्या पालखीचे पूजन करून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना […]

वरुणराजाचे जोरदार आगमन

नाशिक,दि.१९-जिल्यातील अनेक तालुक्यात वरूणराजाचे जोरदार आगमन झाले असून शेतकरी राजा सुखावला असून शेतीची कामे आता जोर धरू लागली आहेत.गोदावरी नदीला यावर्षीचा पहिला पुरही आला आहे.

ग्रामीण रुग्णालयाच्या घटनेची शहनिशा करून दोषींवर कारवाई करा

कोपरगाव,दि.१८- कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला पुढील उपचारार्थ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका सेवा देण्यात हलगर्जीपणा करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमातून समोर आली आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवेच्या बाबतीत जर असे प्रकार होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेची शहानिशा करून आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची […]