अजितदादांच्या आकस्मित जाण्याने राज्यातील साखर उद्योगासह नॅचरल उद्योगाची हानी- बी.बी.ठोंबरे

author
0 minutes, 1 second Read
Spread the love

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी

धाराशिव,दि.३०-राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.दादांच्या आकस्मीत जाण्याने राज्यातील साखर उद्योगासह नॅचरल शुगर परिवाराचीही कधीही न भरून येणारी हानी झाली असल्याचे नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांनी दादांना श्रध्दांजली अपर्ण करताना सांगितले.

    महाराष्ट्रातीचे कुशल,निर्भीड व प्रशासनावर वचक असणारे नेतृत्व राज्याने गमावले आहे.दादा हे राज्यातील साखर उद्योगाचे तारणहार होते.ज्या ज्या वेळी साखर उद्योग अडचणी आला त्या त्या वेळी साखर उद्योगाच्या अडचणी समजावून घेवून,त्यावर क्रांतीकारी निर्णय घेवून साखर उद्योगाला नवसंजिवनी देण्याचे काम दादांनी केले. त्यांच्या जाण्याने राज्यातील साखर उद्योग पोरका झाला असल्याचेही ठोंबरे म्हणाले.

  यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते, तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे,कृषीभूषण पांडुरंग आवाड,संभाजी रेड्डी,प्रवर्तक डाॅ. सर्जेराव साळुंके,सरव्यवस्थापक उध्दव दिवेकर आदी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *