नॅचरल शुगर कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामाचे मील रोलर पूजन संपन्न

author
0 minutes, 1 second Read
Spread the love
जगदीशचंद्र जोशी,प्रतिनिधी
 
कळंब,दि.१२-नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणी या कारखान्याने येता गळीत हंगाम २०२५-२६ ची पूर्व तयारी पूर्ण करण्यासाठी मील रोलरचे पूजन नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे यांच्याहस्ते विधीवत पूजा करून करण्यात आले.
     यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने ऊस पिकास मे महिन्यातील उष्णतेची झळ न पोचल्याने ऊस पीकाची अत्यंत जोमाने वाढ होत आहे. त्यामुळे जून उजाडताच ऊस पीक परिस्थिती अत्यंत समाधानकारक दिसून येत असल्याने व कारखान्याकडे मागील ऊस लागवड हंगामातील ऊस नोंद आवश्यतेप्रमाणे झालेली असल्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने ठेवलेले गाळपाचे १२ लाखाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी आवश्यक तेवढा ऊस उपलब्ध होणार आहे.त्यामुळे येता गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यंत्रसामुग्रीची साफसफाई,दूरूस्ती व देखभालीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. कारखाना जास्तीत जास्त कार्यक्षमतेने चालणार असल्याने तसेच कार्यक्षेत्रात उपलब्ध असणा-या ऊसाचे जास्तीत जास्त १२ लाख टनाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
    रोलर पुजनामुळे कारखान्याच्या सर्व कर्मचा-यां मध्ये एक विशिष्ट उर्जा निर्माण होत असते आणि पुढील कामास गती प्राप्त होते.यंत्रसामुग्री दुरूस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली असून यंत्रसामुग्री उभारणीचे काम हाती घेण्यात आल्याचे श्री ठोंबरे यांनी सांगितले. त्याचाच भाग म्हणून मील उभारणीचे काम मील रोलर पूजनाने करण्यात येत असून निर्धारीत वेळेत कारखाना ऑक्टोबरच्या दुस-या आठवडयात सुरू होणार आहे. येत्या हंगामामध्ये आपण ठरवलेल्या उद्दीष्टाप्रमाणे  ऊस गाळप होणार असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
   यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते, तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे, पांडूरंग आवाड, राजपाल माने,संभाजीराव रेड्डी,प्रवर्तक किशोर डाळे,बाबूराव जाधव, माणिकराव मोरे,अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *