कोपरगाव,दि.१७-कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्ष ईलेक्ट्रिकल विभागाच्या ३३ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली असल्याची माहिती गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटचे प्राचार्य प्रा.सुभाष भारती व प्लेसमेंट अधिकारी प्रा.कैलास भोसले यांनी दिली.

यामध्ये कमिंस इंडिया मध्ये ०५, आय.एफ.बी. मध्ये ०२, इंडोस्कल्प ऑटोकॉम्प्स मध्ये ०८ व आकाश प्रेकिसिओन कॉम्पोनेटस मध्ये १८ अशा एकूण ३३ विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नोकऱ्या मिळाल्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील सर्वच विद्यार्थ्याना निकालापूर्वीच नामांकित कंपन्या नोकरीत सामावून घेत आहे. याबद्दल संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक विभागातील ३३ विद्यार्थ्यांना अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे.
ही एक उल्लेखनीय आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रे
सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्
गौतम पॉलिटेक्निकसाठी ही कामगिरी गौरवास्पद बाब असून, जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरत असून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढत आहे. त्यामुळे यापुढील काळात देखील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या माध्यमातून अभियंता होवून आपले भविष्य उज्वल करणार आहे.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव सौ.चैतालीताई काळे, संस्थेचे सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, प्रशासकीय अधिकारी प्रा.नारायण बारे, प्राचार्य प्रा.सुभाष भारती, कार्यालयीन अधीक्षक आण्णासाहेब बढे यांनी अभिनंदन केले आहे.