परविन शेख यांचा स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार देवून गौरव

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love
जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
कळंब,दि.८-निपाणी येथील महिला शेतकरी सौ.परविन फकरुद्यीन शेख यांच्या कृषी क्षेत्रातील कामगरीची दखल घेत कळंब तालूका पत्रकार संघा तर्फे दिला जाणारा स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार जाहिर केला होता.या पुरस्काराचा वितरण सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे व विश्वस्त सतीश टोनगे यांच्या मार्गर्शणाखाली शिराढोण येथील गायत्री काॅम्प्यूटर्स येथे संपन्न झाला.
      पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच लक्ष्मीताई म्हेत्रे या होत्या तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डाॅ.अमोल पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर,पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर पवार यांची होती.मान्यवरांच्या उपस्थीत महिला शेतकरी सौ.परविन शेख व त्यांचे पती फकरुद्यीन शेख यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.  
    सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांनी कळंब तालूका पत्रकार संघाच्या वतिने देण्यात येणारा हा कृषी वैभव पुरस्काराचा उपक्रम अतिशय स्तूत्य असून या माध्यमातून शेती क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उर्जा प्राप्त होईल आणी आणखीन चांगल्या पध्दतीने अधूनीक शेती करुन शेतकरी आपल्या कूटूंबाचा आर्थीक उत्कर्ष करतील असे मत यावेळी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक करुन जेष्ठ पत्रकार जगदिशचंद्र जोशी यांनी आभार मानले.
   कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, राजू डांगे, चंद्रकांत महाजन,नवनाथ खोडसे, पवन म्हेत्रे,  बाळासाहेब कणसे, बालाजी काटे, दिनेश कावळे,बालाजी धाकतोडे, स्व.राजेंद्र मुंदडा यांचे चिरंजिव गौरव मुंदडा आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार जगदिशचंद्र जोशी, रणजित गवळी, राहूल ओमणे, दादा खतीब, ताजखाॅं पठाण, आकाश पवार, राहूल पाटील, अमोलसिंह चंदेल यांनी पुढाकार घेतला.
                  तीन एकरातून आर्थिक उन्नती
     निपाणी ता.कळंब येथील महिला शेतकरी परविन फकरुद्यीन शेख यांनी तीन एकर क्षेत्रात स्वतः कष्ट करुन विविध प्रयोगातून उन्नती साधली आहे. टरबूज, टोमॅटो, मिरची, घेवडा आदी उत्पादन घेत शेतीपुरक दुग्ध व्यावसायही करुन त्यांनी आपली आर्थीक उन्नती केली आहे. त्यांच्या अथक परीश्रमातून फुलवलेल्या शेती क्षेत्रातील कामगरीची दखल कळंब तालूका पत्रकार संघाने घेवून स्व.राजेंद्र मुदडा कृषी वैभव पुरस्कार देवून गौरव केल्याने शिराढोण गाव व परीसरात सार्थ व योग्य निवड केल्याची भावना व्यक्त होत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *