गणेश ओझा,प्रतिनिधी
सिन्नर,दि.३०-तालुक्यातील वावी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सिन्नर अंतर्गत भारत सरकारच्या विविध योजनांचे मार्गदर्शन शिबिर पार पडले.
शिबिरात वैयक्तिक बचत खाते,बचतगटांचे खाते,४३६ रुपयांची प्रधानमंत्री जीवनज्योती योजना वयवर्षं १८ ते ५० वयोगटासाठी,२० रुपयांची प्रधानमंत्री सुरक्षा अपघाती विमा १८ ते ७० वयोगटासाठी,अटल पेन्शन योजना,महिलांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती व समूहाचे/,बचतगटांचे/वैयक्तिक कर्जप्रस्ताव यांची सविस्तर माहिती बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय व्यवस्थापक बी.बी.बेहरा,जिल्हा व्यवस्थापक भिवा लवटे,जिल्हा नियोजन अधिकारी पंकज कारले व शाखा व्यवस्थापक श्रेयस बर्वे यांनी दिली.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रकडून २ बचतगटांना प्रत्येकी ५ लाखांचे कर्जवितरण करण्यात आले तसेच उमेदअभियानाविषयी तालुका व्यवस्थापक विजय कुटे यांनी मार्गदर्शन केले.उपस्थित महिलांनी शासनाच्या विविध विमाचा लाभ घेतला.कार्यक्रमास शिला देव्हाड,मनीषा आनप,मनीषा भगत,सुनीता वाजे,स्वाती वेलजाळी,बँक मित्र आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा लोंढे यांनी केले तर शाखा व्यवस्थापक श्रेयस बर्वे,उपव्यवस्थापक अर्जुन जावळे,कावेरी सुराशे,गौतम कुमार,नाईक,सुदर्शन पठाडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.