गणेश ओझा,प्रतिनिधी
सिन्नर,दि.१३-तालुक्यातील वावी येथील जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण पंडित जाधव व उपाध्यक्ष सिताराम किसन सापते यांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना स्वखर्चातून टाय व बेल्टचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाणके,गजानन ठोंबरे,रमेश राजपूत,योगेश शेवरे,ज्योती गोर्वधने,मनीषा हांडे,गौरी जाधव,मनीषा रासकर,सुनंदा नवले,नाना नवले,बाळासाहेब मोरे,निलेश ताजने आदी उपस्थित होते.