वावी विद्यालयाची कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love

 

गणेश ओझा,प्रतिनिधी

सिन्नर,दि.११-क्रीडा व युवक संचालनालय व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने सिन्नर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा एस.एल.एम इंग्लिश मीडियम स्कूल सोनारी येथे नुकत्याच पार पडल्या.

    स्पर्धा १४ वर्षे,१७ वर्षे, १९ वर्षे मुली या वयोगटात घेण्यात आली त्यात ७५ शाळांच्या संघानी सहभाग नोंदविला.स्पर्धेत वावी येथील नूतन विद्यालयाचे १४ वर्षे व १९ वर्षे मुलीच्या संघानी सहभाग घेतला.नूतन विद्यालयाच्या १९ वर्षे मुलींच्या संघाने विजेतेपद पटकवून त्यांची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

   खेळाडूंना विद्यालयाचे क्रीड़ा शिक्षक विजय शिंदे ,शिवाजी सरोदे,निवृती आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.

    विजयी खेळाडूचे व क्रीडाशिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य मखरे, उपमुख्याध्यापक सोनवणे,पर्यवेक्षक दिघे,चेअरमन रामनाथ कर्पे, सदस्य,पालक,ग्रामस्थांनी कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *