सिन्नर,दि.१४-सिन्नर शहर, औद्योगिक क्षेत्र, तसेच ग्रामीण भागात इलेक्ट्रिक,इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विक्रीसाठी येणाऱ्या भामट्यांकडून नागरिकांना गंडवण्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आपल्या परिसरात, गावात इलेक्ट्रिक शेगडी, मिक्सर, गॅस शेगड्या किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करण्यासाठी बाहेरगावाहून काही लोक येत आहेत. ग्रामस्थांनी त्यांच्याकडील शेगडी किंवा वस्तू विकत घेतल्यानंतर हे लोक त्यांना लाकडी फर्निचर, फ्रिज किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ५० टक्के दरात
किंवा स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अॅडव्हान्स म्हणून पैसे घेऊन निघून जातात. त्यानंतर पुन्हा ते फोन उचलत नाहीत. परिणामी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गावात शेगड्या किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री करण्यासाठी येणाऱ्या
लोकांकडून कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक शेगड्या किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी न करता अशा व्यक्तींना थांबवून ठेवून तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.