ऊस दराच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेवू-आ.आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु कोपरगाव,दि.३१- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही. आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात परंतु आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे. तो वसा आणि वारसा पुढे […]

बुधवारी कर्मवीर शंकररावजी काळे यांचे १३ वे पुण्यस्मरण

कोपरगाव,दि.३०-रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य व शिक्षण सेवेचा वसा निस्वार्थ सेवेतून पुढे चालवितांना सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वातून वेगळी ओळख निर्माण करणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १३  व्या पुण्यस्मरणनिमित्त बुधवार  दि.५ रोजी सकाळी ९ वाजता पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे. तसेच सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.डॉ. विजयकुमार फड (निवृत्त आय.ए.एस.ऑफिसर) यांच्या सुश्राव्य हरी किर्तनाचा कार्यक्रम कर्मवीर शंकरराव […]

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ-आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.२९- राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचवर्षीय वेतनवाढ देण्यासाठी राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाचे स्वागत करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ पासून १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले. दिवाळी सणाचे औचित्य साधत साखर […]

सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या बळवंत ढोमसेची कुस्ती स्पर्धेत कास्य पदकाची कमाई

कोपरगाव,दि.२८:- ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक यांचे वतीने दिनांक २५ व २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या एम.ए.च्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी बळवंत शरद ढोमसे याने कास्य पदक मिळविले असल्याची माहिती प्र.प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली. ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक […]

मराठवाड्यात नॅचरल शुगर उच्चांकी ऊसदर देणार-बी.बी.ठोंबरे

  चालू हंगामात तेरा लाख पंचवीस हजार मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२६- मराठवाड्यात नॅचरल उद्योग समुह यावर्षी गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला सर्वाधिक दर देणार असून या हंगामात तेरा लाख पंचवीस हजार मे.टन ऊसाचे गाळप करणार असल्याची माहिती नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे यांनी दिली. नॅचरलच्या २४ व्या गाळप हंगामाचा मागील गळीत […]

पिंपरवाडी येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न

गणेश ओझा,विशेष प्रतिनिधी सिन्नर,दि.२६-तालुक्यातील पिंपरवाडी(यशवंतनगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच केशरबाई हाडोळे,विजय गायकवाड,कैलास काकड,भूषण हाडोळे रवींद्र गायकवाड उपस्थित होते.     सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला त्यानंतर […]

 ‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग उद्या कोपरगावात

कोपरगाव,दि.२६- कोपरगावकरांसाठी आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आ.आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या सोमवार दि.२७ रोजी सायंकाळी ६ वाजता कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे.  या बहुचर्चित कार्यक्रमासाठी ‘अगं बाई सासूबाई फेम’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित राहणार असून समवेत ‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग, रील स्टार राशी […]

धामोरीतील गोई नदीवरील पुलाचा अनेक दशकांपासूनचा प्रश्न कायमचा सुटल्याचे समाधान -आ.आशुतोष काळे

कोपरगाव,दि.२५–कोपरगाव तालुक्याच्या धामोरी येथील गोई नदीवरील पूल हा धामोरीसह, मायगाव देवी, सांगवी भुसार, चासनळी, मोर्वीस गावातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा पूल होता. परंतु पावसाळ्यात थोडा जास्त पाऊस झाला की, हा पूल पाण्याखाली जावून जनजीवन विस्कळीत होत होते. त्यामुळे हा पूल व्हावा हि धामोरीसह, मायगाव देवी, सांगवी भुसार, चासनळी, मोर्वीस गावातील नागरिकांची मागणी होती. नागरीकांना येणाऱ्या अडचणींची […]

गुळ पावडर कारखान्यांनी गाळपासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२४- गुळ पावडर कारखान्यांनी गाळपासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल ३००० रुपये द्यावी आणि अंतिम दर ३५०० रुपये द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  मोटारसायकल रॅली काढून सहा गुळ पावडर कारखाना व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा युवा आघाडी संघटनेचे अध्यक्ष विष्णूदास काळे यांनी दिली. यावर्षी अतिवृष्टीच्या पावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात […]

नॅचरल उद्योग समूहाचा २६ ऑक्टोबरला गळीत हंगामाचा शुभारंभ

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी धाराशिव,दि.२४-नॅचरल उद्योग समूहाच्या साल सन २०२५-२६ या २४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी दि.२६ होणार आहे.या गळीत हंगामाचा प्रारंभ सन २०२४-२५ या हंगामात कारखान्यास सर्वाधीक ऊस पुरवठा करणारे लोहटा पूर्व येथील शेतकरी प्रदिप रामदास खोसे आणि सौ.अर्चना प्रदिप खोसे या दाम्पत्याच्या हस्ते गव्हाण पूजन करुन गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात येणार आहे.नॅचरल […]

अतिवृष्टीची तालुक्याला मिळाली ३१.७० कोटींची नुकसान भरपाई

  मुंबई,दि.२३ :- राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून त्याचा फटका संपूर्ण कोपरगाव मतदार संघाला देखील बसला होता.शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भर पावसात पाहणी करून आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देवून पंचनाम्याबाबत दाखविलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त […]

घरफोडी करीत सोने व ७५ हजार रोख रक्कमेची चोरी

नाशिक,दि.२२-वैभव तुकाराम सांगळे रा.खळवाडे यांच्या घरातून १ तोळा सोन्याचे दागिने व ७५ हजार रोख रक्कमेची चोरी झाली असून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदावरी नदीवर कोपरगाव तालुक्यात साकारणार आणखी एक सेतू

कोपरगाव,दि.२१- एम.डी.आर असो किंवा नसो ग्रामीण मार्ग असो किंवा नसो ज्या ठिकाणी नागरिकांची पुलाची मागणी आहे ज्या ठिकाणी पूल करणे अत्यंत गरजेचे आहे त्या ठिकाणी पूल उभारण्यास मंजुरी देण्याचा महत्वाचा निर्णय महायुती शासनाने घेतला आहे. मा.आ.अशोकराव काळे यांनी गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी पूल उभारले त्यामुळे दळणवळण वाढले त्याचा फायदा अनेक गावांना झाला.धारणगाव-कुंभारी पुलामुळे संपूर्ण पश्चिम […]

राष्ट्रीय एकात्मता शिबिरात कु.ईश्वरी निंबाळकरची चमकदार कामगिरी

कोपरगाव,दि. केंद्र सरकार आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.ईश्वरी विठ्ठल निंबाळकर हिने धावण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली. हरियाणा राज्यातील हिसार येथील चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठ येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिर पार […]