गुळ पावडर कारखान्यांनी गाळपासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

author
0 minutes, 0 seconds Read
Spread the love

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी

धाराशिव,दि.२४- गुळ पावडर कारखान्यांनी गाळपासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल ३००० रुपये द्यावी आणि अंतिम दर ३५०० रुपये द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  मोटारसायकल रॅली काढून सहा गुळ पावडर कारखाना व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा युवा आघाडी संघटनेचे अध्यक्ष विष्णूदास काळे यांनी दिली.

यावर्षी अतिवृष्टीच्या पावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ऊसाचे उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा खर्च झालेला आहे.या साठी साल सन २०२५-२६ या चालू वर्षी गाळपासाठी आलेल्या ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्यावी आणि अंतिम दर तीन हजार पाचशे रुपये द्यावा.अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा युवा आघाडीचे वतीने शिराढोण येथून मोटार सायकल रॅली काढून करण्यात आली.गुळ पावडर कारखाना असोसिएशनच्या वतीने नुकतीच एक बैठक घेऊन या वर्षी गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला -२४०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

 गुळ पावडर कारखान्यांचा गाळप झालेल्या ऊसाला उतारा उत्तम आणि चांगला आहे यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धाराशिव तालुक्यातील जागजी व कसबे तडवळे आणि कळंब तालुक्यातील वाठवडा,मोहा,जवळा,खामसवाडीसह एकूण सहा गुळ पावडर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले या रॅलीत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *