जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
धाराशिव,दि.१८-साईनगर रांजणी ता कळंब येथील नॅचरल उद्योग समूहाने युनिटमधील सर्व कर्मचा-यांना दिवाळी सण आनंदाने साजरा करता यावा म्हणून बोनस कायद्यानुसार ८.३३ टक्के बोनस व चालु गळीत हंगामात निर्धारीत उद्दीष्ट पुर्ण करणेसाठी १६.६७ टक्के बक्षीस जाहीर केले असून बोनस व बक्षीस मिळून एकूण २५ टक्के रक्कम कर्मचा-यांचे संबंधीत श्री साई पतसंस्थेचे खात्यामध्ये जमा केली असल्याची माहिती नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे यांनी दिली.
नॅचरल उद्योग समूहाने मराठवाडा व विदर्भामध्ये कर्मचा-यांना सर्वाधीक बोनस देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.