सिन्नर,दि.१६-तालुक्यातील वावी येथे श्रीमंत शहाजी महाराज यांचे बंधू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे काका श्रीमंत खेळोजी राजेभोसले यांची पुण्यतिथी संत तुकाराम महाराज मंदिरात आज साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत खेळोजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठलराव राजेभोसले यांनी केले.श्रीमंत खेळोजी राजे यांचा अपरिचित आणि दैदिप्यमान असलेला इतिहास प्राध्यापक सागर राजेभोसले यांनी सांगितला.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती कृष्णा घुमरे तसेच राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार श्रीमंत खेळोजीराजे प्रतिष्ठान वावी यांच्याकडून करण्यात आला.कृष्णा घुमरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित असलेल्या राजेभोसले घराण्याची माहिती ऐकून आपल्या भाषणात इतिहास सर्वांपर्यंतपोहोचवण्याची गरज असून दैदिप्यमान इतिहासातून शिकून भविष्यात आपण येणाऱ्या संकटांचा सामना करणारा समाज घडविण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी पांडुरंग महाराजगिरी वावीकर,कारभारी वेलजाळी,गणेश वेलजाळी यांनी मनोगत व्यक्त केले.
विलास पांगारकर यांनी श्रीमंत खेळोजी राजे प्रतिष्ठानने सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक असून श्रीमंत खेळोजी राजे यांचा इतिहास सर्वांना परिचित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे.खेळोजीराजे आणि त्यांच्या वंशजांचा इतिहास शासन दरबारी मांडून त्यांचेही स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
कार्यक्रमास सरपंच विजय काटे,रामनाथ कर्पे,रमेश
पांगरकर,दुसंगवाडीचे सरपंच कानिफनाथ घोटेकर,वावी विकास सोसायटीचे चेअरमन संदीप भोसले,अशोक ताजने,संतोष वरपे,आशिष माळवे,कचरु घोटेकर,विठ्ठलराव उगले,नंदलाल मालपाणी,संजय भोसले,राजेद्र भोसले,विनायकघेगडमल,रामदास घेगडमल,शिखर शिंगणापूरचे सेवाधारी पुजारी प्रमोद पवार,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमंत खेळोजी राजेभोसले प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.