सिन्नर,दि.१६-तालुक्यातील वावी येथे श्रीमंत शहाजी महाराज यांचे बंधू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे काका श्रीमंत खेळोजी राजेभोसले यांची पुण्यतिथी संत तुकाराम महाराज मंदिरात आज साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत खेळोजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक […]
सिन्नर,दि.१५तालुक्यातील दापूर येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी बसस्थानकासमोरील दोन दुकाने फोडून रोख रकमेसह सोने, चांदीचे दागिने मिळून ३ लाख २३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि. १४) पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दापूर येथे बसस्थानकासमोर सिन्नर-अकोले रस्त्यालगत शिरीष मल्हारी सांगळे (रा. चापडगाव) यांचे साईराज अॅग्रो एजन्सी नावाचे दुकान असून, त्याशेजारीच अरुण अशोक बोऱ्हाडे […]
कोपरगाव,दि.१३- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागांचा विकास व्हावा व या भागातील नागरीकांना मूलभूत व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यची महायुती शासनाने दखल घेवून अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागांच्या विकासासाठी २ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. या २ कोटी निधीतून रस्ते मजबुतीकरण, सांस्कृतिक सभागृह […]
गणेश ओझा,प्रतिनिधी सिन्नर,दि.१२-सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत असलेल्या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणे अवघड होऊन बसलेआहे.बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे हल्ल्यांची भीतीही वाढली आहे. बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्यांवरील झुडपे हटवावीत,अशी मागणी दुशिंगपूरचे सरपंच कानिफनाथ घोटेकर,मलढोणचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी हालवर,राहुल कहांडळ,माळवाडीचे उपसरपंच रविकांत […]
नाशिक,दि.११-मचिंद्र देवराम लव्हाटे रा.श्रीरामनगर,नांदगाव यांच्या बंद घराच्या दरवाजाच्या कडीकोंडा तोडून लोखंडी कपाटातील १,९२,००० किंमतीचे ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहे.याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव,दि.१०- मागील आठवड्यात टाकळी परीसरात ऊस तोडणी मजुराच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतांनाच सोमवार दि.१० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अंदाजे ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती समजताच आ.आशुतोष काळे वीसच मिनिटात घटनास्थळी […]
कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन कोपरगाव,दि.९– आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्नात वाढ करणे हि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ऊस लागवडीसाठी ‘ऊस रोप पद्धती’ ही आधुनिक आणि फायदेशीर तंत्रज्ञानाधारित पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉ.अंकुश चोरमुले (एम.डी.गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज, सांगली) […]
कोपरगाव,दि.८- माझ्या कॉलेज जीवनापासून मला अहिल्यानगर जिल्ह्याबद्दल एक वेगळेच आकर्षण असून या जिल्ह्याचे वैशिष्ठ म्हणजे या जिल्ह्यातील मुलांमध्ये जेवढा विनम्रपणा आहे तेवढा विनम्रपणा कुठेही नाही. केंद्र शासनाच्या तसेच राज्याच्या योजना मतदार संघाला मिळाल्या पाहिजे.त्याचा लाभ सर्वसामान्य, गोरगरीब माणसाला झाला पाहिजे. मागासवर्गीय असेल, अल्पसंख्यांक असेल अशा प्रत्येक समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल याबाबतची […]
गणेश ओझा,प्रतिनिधी कोपरगाव,दि.७-कधी दुष्काळ पडतो तर कधी गारपीट होते आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलं की, बाजारभाव पडतात.त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत.शेतकऱ्यांच्या अडचणी काय असतात याची मला जाणीव आहे कारण मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे.अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत नाही तर सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही मतदान करण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रमाणे निर्णय घेण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
कोपरगाव,दि.६- कोपरगाव मतदार संघातील टाकळी गावाच्या परीसरात बुधवार दि.५ रोजी बिबट्याने ऊस तोडणी करणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या हल्ल्यात या चिमकुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. सदरची घटना अत्यंत हृदयद्रावक असून, स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मानवी रक्ताला चटावलेल्या त्या नरभक्षक बिबट्याचा ज्याप्रमाणे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बिबट्याचा बंदोबस्त केला आहे त्याप्रमाणे […]
कोपरगाव,दि.४ कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या १.८० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत कोपरगावकरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या १.८० कोटींच्या निधीतून कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे ०१ कोटी निधीतून भव्य व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून ८० लाख रुपये निधीतून गुरु शुक्राचार्य मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. कोपरगाव शहरातील नागरीकांच्या विकासाच्या अपेक्षा […]
कोपरगाव,दि.३- झगडे फाटा ते तळेगाव या रस्त्याबरोबरच साईबाबा कॉर्नर ते वैजापूर, शिंगणापूर रेल्वे चौकी ते संवत्सर, कोळपेवाडी कोपरगावला जोडणारा एम.डी.आर.८५ व एम.डी.आर.०८ अशा जवळपास ५४ किलोमीटर रस्त्यांचा विकास होणार आहे. हे रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे प्रयत्न सुरु असून या रस्त्यांना लवकरच मंजुरी पण मिळणार आहे. हे सर्व रस्ते मीच […]
कोपरगाव,दि.२:- कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला असून नागरीकांना पाण्याची अडचण येवू नये यासाठी पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव भरून घेण्यासाठी गोदावरी डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव शहरासाठी पाणी सोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या. आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमितपणे चार दिवसाआड […]
मुंबई,दि.१- सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून लेखाशीर्ष ३०५४ व ३०६८ योजनेतून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ३.९० कोटी रक्कमेच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी निधी मिळावा यासाठी अनेक प्रस्ताव शासनदरबारी सादर करून प्रस्ताव सादर केल्यापासून […]